‘मिलन टॉकीज’साठी आदित्य-श्रद्धा फायनल

By Admin | Updated: August 30, 2014 22:48 IST2014-08-30T22:48:52+5:302014-08-30T22:48:52+5:30

तिगमांशू धुलिया यांच्या ‘मिलन टॉकीज’ या चित्रपटाला अखेर कलाकार मिळाले असून, या चित्रपटात ‘आशिकी-2’ची हिट जोडी श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Aditya-Shradha Final for 'Milan Talkies' | ‘मिलन टॉकीज’साठी आदित्य-श्रद्धा फायनल

‘मिलन टॉकीज’साठी आदित्य-श्रद्धा फायनल

तिगमांशू धुलिया यांच्या ‘मिलन टॉकीज’ या चित्रपटाला अखेर कलाकार मिळाले असून, या चित्रपटात ‘आशिकी-2’ची हिट जोडी श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी चित्रपटात इमरान खान, प्रियंका चोप्रा, शाहीद कपूर, सोनाक्षी सिन्हा यांना चित्रपटासाठी साईन करण्यात आले होते; पण कोणत्या ना कोणत्या कारणाने ते या चित्रपटातून बाहेर पडले. नुकतेच आदित्य आणि श्रद्धाची निवड करण्यात आली आहे. याबाबत बोलताना धुलिया म्हणाले की, ‘आदित्य आणि श्रद्धाचे नाव चित्रपटासाठी फायनल झाले आहे. ‘आशिकी-2’च्या आधी श्रद्धा या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी आली होती. तेव्हापासून ती चित्रपटासाठी माझी पहिली पसंती होती. पुरुष कलाकारांबाबत सांगायचे तर ज्या अभिनेत्यांशी आम्ही संपर्क केला त्यांच्याकडे तारखांची समस्या होती. त्यामुळे करारावर सही करण्यापूर्वीच त्यांनी माघार घेतली. आदित्य आणि श्रद्धा चित्रपटासाठी परफेक्ट आहेत.’ हा चित्रपट याचवर्षी रिलीज करायचा होता; पण आता पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

Web Title: Aditya-Shradha Final for 'Milan Talkies'