वयाच्या ५४ व्या वर्षी डॉक्टरांच्या प्रेमात पडली अभिनेत्री; दुसऱ्या लग्नानंतर नवऱ्याने केले अतोनात हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 10:46 AM2023-11-16T10:46:19+5:302023-11-16T10:49:54+5:30
Vidya sinha: पतीच्या निधनानंतर विदेशात स्थायिक झालेल्या विद्या स्नेहा तिथेच एका शेजारी राहणाऱ्या डॉक्टरांच्या प्रेमात पडल्या.
बॉलिवूडच्या इतिहासात आज अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी ७० ते ९० चा काळ गाजवला. या अभिनेत्रींच्या यादीत जीनत अमान, परवीन बाबी (parveen babi), रेखा (rekha), मंदाकिनी अशा कितीतरी अभिनेत्रींची नाव समोर येतात. परंतु, या सगळ्यांना एक अभिनेत्री चांगलीच टक्कर देत होती ती म्हणजे विद्या सिन्हा ( Vidya sinha). सौंदर्य आणि अभिनयशैली यांच्या जोरावर विद्या सिन्हा यांनी इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या हक्काचं स्थान निर्माण केलं. परंतु, त्यांचं फिल्मी करिअर जितकं यशस्वी ठरलं. तितकंच त्यांनी खऱ्या आयुष्यात प्रचंड खस्ता खाल्ल्या.
विद्या सिन्हा आज आपल्यात नाही. मात्र, त्यांच्या अभिनयातून त्या कायम प्रेक्षकांमझ्ये चर्चेत राहिल्या. राजा काका या सिनेमातून त्यांनी इंडस्ट्रीत पदार्पण केलं. या सिनेमानंतर त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमा दिले. विद्या सिन्हा या सलमान खानच्या बॉडीगार्ड या सिनेमात अखेरच्या झळकल्या होत्या. विद्या सिन्हा यांनी वयाच्या ५४ व्या वर्षी दुसरं लग्न केलं होतं.
विद्या यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यंकटेश्वरन अय्यर यांच्यासोबत १९६८ मध्ये लग्न केलं होतं. लग्नानंतर त्यानी जाह्नवी या मुलीला दत्तक सुद्धा घेतलं होतं. परंतु, १९९६ मध्ये व्यंकटेश्वरन यांचं आजारपणामुळे निधन झालं. नवऱ्याच्या निधनानंतर विद्या यांना मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्या देश सोडून सिडनीमध्ये स्थायिक झाल्या. सिडनीमध्ये राहत असताना त्यांची ओळख डॉक्टर नेताजी भीमराव साळुंखे यांच्यासोबत झाली. शेजारी राहणाऱ्या साळुंखे यांच्या प्रेमात त्या पडल्या आणि या दोघांनी २००१ मध्ये लग्न केलं. परंतु, त्यांचा हा संसारही फार काळ टिकला नाही. २००९ मध्ये ते विभक्त झाले.
दरम्यान, विद्या सिन्हाने साळुंखे यांच्यावर पोलिस तक्रार करत त्यांच्यावर शारीरिक व मानसिक छळाचे आरोप केले होते. विद्या सिन्हा यांनी बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट सिनेमा दिले. त्यात छोटी सी बात, मेरा जीवन, इनकार, जीवन मुक्त, किताब, पती पत्नी और वो हे त्यांचे काही निवड सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजले. तसंच त्यांनी काव्यांजली, कुल्फी कुमार बाजेवाला, हार जीत, चंद्रनंदिनी या मालिकांमध्ये काम केलं आहे. २०१९ मध्ये विद्या सिन्हा यांचं वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झालं.