या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला गुपचुप साखरपुडा, सेक्स स्कॅंडमध्ये अडकलं होतं नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 17:31 IST2018-06-04T17:25:23+5:302018-06-04T17:31:08+5:30
'मकडी' या सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड मिळालेली अभिनेत्री श्वेता बसू प्रसादने बॉयफ्रेन्ड रोहित मित्तल सोबत गुपचुप साखरपुडा केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रसिद्ध अभिनेत्रीने केला गुपचुप साखरपुडा, सेक्स स्कॅंडमध्ये अडकलं होतं नाव
मुंबई : 'मकडी' या सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड मिळालेली अभिनेत्री श्वेता बसू प्रसादने बॉयफ्रेन्ड रोहित मित्तल सोबत गुपचुप साखरपुडा केल्याची माहिती समोर आली आहे. 27 वर्षीय श्वेताने 31 वर्षीय रोहितसोबत गेल्यावर्षीच साखरपुडा केल्याचं समजतंय. पण ही माहिती आता समोर आलीये.
मालिका, बॉलिवूड आणि साऊथ सिने इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळवल्यानंतर श्वेता शेवटची चंद्रनंदनी या मालिकेत दिसली होती. दोघे गेल्या वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. एका मीडिया रिपोर्टनुसार, या दोघांची भेट घडवण्यात दिग्दर्शक अनुराग कश्यपची महत्वाची भूमिका आहे. श्वेता आणि रोहित दोघेही अनुरागच्या जवळचे मानले जातात.
कशी झाली भेट?
श्वेता बसू प्रसादने अनुराग कश्यपच्या फॅंटम फिल्म्समध्ये स्क्रिप्ट कन्सल्टंट म्हणून काम केलं होतं. त्यावेळीच तिची भेट दिग्दर्शक रोहित मित्तलसोबत झाली. दोघांनी एका शॉर्टफिल्मसाठीही काम केलं होतं.
4 वर्षांपासून करत होते डेटिंग
अभिनेत्री श्वेता आणि दिग्दर्शक रोहित मित्तल एकमेकांना साधारण 4 वर्षांपासून डेट करत होते. महत्वाची गोष्ट म्हणजे श्वेतानेच रोहितला गोव्यात प्रपोज केले होते. नंतर रोहितने श्वेताला पुण्यात लग्नासाठी विचारले आणि दोघांनी साखरपुडा केला.
सेक्स स्कॅंडलमध्ये अडकली होती श्वेता
2014 मध्ये श्वेता प्रसादचं नाव एका सेक्स स्कॅंडलमध्ये आलं होतं. तिला हैदराबादमध्ये एका रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर तिला हैदराबाद सेशन कोर्टाने क्लीन चीट दिली.