संभावना सेठला मातृशोक; दीर्घ आजारामुळे झालं अभिनेत्रीच्या आईचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 16:55 IST2024-02-21T16:55:18+5:302024-02-21T16:55:52+5:30
Sambhavna seth mother:संभावनाची आई गेल्या कित्येक काळापासून एका गंभीर आजाराने त्रस्त होती.

संभावना सेठला मातृशोक; दीर्घ आजारामुळे झालं अभिनेत्रीच्या आईचं निधन
लोकप्रिय भोजपुरी अभिनेत्री संभावना सेठ हिच्या आईचं निधन झालं आहे. मंगळवारी (२० फेब्रुवारी) संभावनाच्या आईने अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या पतीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली आहे. सोबतच एक भावनिक पोस्टदेखील शेअर केली. संभावनाची ही पोस्ट पाहिल्यानंतर गौहर खानपासून मोनालिसीपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी तिच्या आईला आदरांजली वाहिली आहे.
संभावनाची आई गेल्या कित्येक काळापासून एका गंभीर आजाराने त्रस्त होती. या दीर्घकालीन आजारामुळेच अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. २० फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७.३० वाजता तिच्या आईने अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, अनेक सेलिब्रिटींनी संभावनाच्या पोस्टवर कमेंट करत आदरांजली वाहिली आहे. संभावना लोकप्रिय अभिनेत्री असून तिने बॉलिवूड आणि भोजपुरी सिनेमांमध्ये काम केलं आहे. बिग बॉस 8 मध्ये सुद्धा ती झळकली होती. संभावनाने २०१६ मध्ये अविनाश द्विवेदी याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.