पूजा भटचा जुना फोटो पाहून चाहत्यांना झाला आलियाचाच भास, कमेंट करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:56 IST2025-11-20T17:55:22+5:302025-11-20T17:56:03+5:30
कोण होती महेश भट यांची पहिली पत्नी?

पूजा भटचा जुना फोटो पाहून चाहत्यांना झाला आलियाचाच भास, कमेंट करत म्हणाले...
आलिया भट ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. आलिया अगदी तिची आई सोनी राजदानसारखीच दिसते. मात्र आईच नाही तर आलिया आपल्या सावत्र बहिणीसारखीही दिसते अशी अनेकदा चर्चा होते. महेश भट यांच्या पहिल्या पत्नीपासूनची मुलगी पूजा भट ही तरुणपणी सर्वांची क्रश होती. पूजाचे जुने फोटो पाहून आताच्या आलियासारखाच भास होतो अशी चाहते प्रतिक्रिया देत आहेत.
पूजा भटचा एक जुना फोटो रेडिटवर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून लोकांना आलिया भटच वाटत आहे. सेम सेम बट डिफरंट अशा प्रतिक्रियाही चाहत्यांनी दिल्या आहेत. पूजा आलियाहून २१ वर्ष मोठी आहे. महेश भट यांची पहिली पत्नी लॉरेन ब्राइटची ती मुलगी आहे. त्यांचं नंतर किरण असं नाव ठेवलं होतं. तर आलिया भट ही महेश भट यांच्या दुसऱ्या पत्नीची सोनी राजदानची मुलगी आहे. 'कॉफी विथ करण' शोमध्ये आलिया भटला प्रश्न विचारण्यात आला की, 'तुझ्याबद्दल तू ऐकलेली सर्वात विचित्र अफवा कोणती?' यावर आलिया भट म्हणाली, 'की मी पूजा भट आणि महेश भट यांची मुलगी आहे'.
Thought it was Alia Bhatt till I looked closely
byu/atrocious_almonds inBollyBlindsNGossip
महेश भट यांनी पहिल्या पत्नीसोबतच्या लव्हस्टोरीवर एक सिनेमाही काढला होता. ते पहिल्या पत्नीला भेटले तेव्हा तिचं वय फक्त १४ वर्ष होतं तर महेश भट स्वत: फक्त १६ वर्षांचे होते. लॉरेन अनाथालयात राहत होती कारण त्यांच्या आईजवळ हॉस्टेलमध्ये ठेवण्याचे पैसे नव्हते. दोघांची लव्हस्टोरी खूप कठीण होती. लग्नानंतर महेश भट आणि लॉरेन यांना पूजा आणि राहुल ही दोन मुलं झाली.