"मुलाला मी कडेवर घेऊ शकत नाही, कारण.."; प्रसिद्ध अभिनेत्रीने मांडलं दुःख, म्हणाली- "तो माझ्याजवळ येतो, पण.."
By देवेंद्र जाधव | Updated: July 14, 2025 16:56 IST2025-07-14T16:53:40+5:302025-07-14T16:56:20+5:30
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने तिच्या मनातील दुःख व्यक्त केलंय. पोटचा लेक जवळ येत असूनही ती त्याला कडेवर घेऊ शकत नाही, हे दुःख तिने मांडलं आहे

"मुलाला मी कडेवर घेऊ शकत नाही, कारण.."; प्रसिद्ध अभिनेत्रीने मांडलं दुःख, म्हणाली- "तो माझ्याजवळ येतो, पण.."
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कडवर काही दिवसांपूर्वी लिव्हर ट्यूमरची शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर आता तिच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. सध्या दीपिका ही पूर्णपणे बरी झाली असली तरी तिच्या शरीरात अजूनही थकवा आहे. त्यामुळे तिला छोट्या मुलाला कडेवर घेऊन त्याचे लाड करता येत नाहीयेत. दीपिकाने तिचं दुःख सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलं आहे. काय म्हणाली दीपिका? जाणून घ्या.
दीपिकाला मुलाला कडेवर घेता येत नाही, कारण...
दीपिकाने आपल्या Vlog द्वारे सांगितले की, “शस्त्रक्रियेनंतर माझ्या शरीरात खूप बदल जाणवले. आता मला लवकर थकवा येतो, आणि अगदी माझा मुलगा रुहानला उचलण्याइतकी ताकदसुद्धा उरलेली नाही. रुहान जेव्हा माझ्याकडे येतो, तेव्हा मला त्याला उचलता येत नाही. त्यामुळे तो निराश होतो, आणि मला फार वाईट वाटतं.” दीपिकाने सध्या कोणतेही काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. “सध्या मी फक्त शरीराला पूर्ण विश्रांती देतेय. टाके हळूहळू भरत आहेत. थोडीशी ऊर्जा परत येतेय, पण अजून स्वतःची खूप काळजी घ्यावी लागते,” असं तिने स्पष्ट केलं.
या कठीण काळात तिला तोंडात अल्सर झाल्याचेही तिचे पती शोएब इब्राहिम यांनी सांगितले. त्यामुळे तिचं खाणं-पिणं आणि बोलणंसुद्धा मर्यादित आहे. दीपिका सध्या स्वतःकडे आणि कुटुंबाकडे लक्ष देत आहे. ती म्हणाली, “सध्या मी फक्त सकारात्मक विचार करते, जुन्या कविता वाचते आणि लिहिते. योगसाधनेचा आधार घेते. या सर्व गोष्टी मला मानसिक ताकद देतात.” दीपिकाने कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करुन सकारात्मक विचार आणि योग्य ती काळजी घेऊन शारीरिक आणि मानसिकरित्या हळूहळू पूर्ववत होत आहे.