अभिनेता सैफ अली खानची अडचण वाढणार? सरकार घेऊ शकतं मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:59 IST2025-01-21T12:58:50+5:302025-01-21T12:59:59+5:30

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अभिनेता सैफ अली खान, त्याची आई शर्मिला टागोर, बहिणी सोहा आणि सबा अली खान तसेच पतौडीची बहीण सबिहा सुलतान यांना शत्रू संपत्ती प्रकरणात अपीलीय अधिकाऱ्यांसमोर त्यांची बाजू मांडण्याचे आदेश दिले होते...

Actor saif ali khan property can take by Madhya pradesh government in jabalpur | अभिनेता सैफ अली खानची अडचण वाढणार? सरकार घेऊ शकतं मोठा निर्णय!

अभिनेता सैफ अली खानची अडचण वाढणार? सरकार घेऊ शकतं मोठा निर्णय!

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील अभिनेता सैफ अली खान कुटुंबाची १५ हजार कोटी रुपयांची मालमत्ता सरकार ताब्यात घेऊ शकते. सैफ अली खान आणि शर्मिला टागोर कुटुंबाची मालमत्ता भोपाळमधील कोहेफिजा ते चिकलोदपर्यंत पसरलेली आहे. पतौडी कुटुंबाच्या सुमारे १०० एकर जमिनीवर दीड लाख लोक राहत आहेत. भोपाळ रियासतीच्या ऐतिहासिक संपत्तींवर २०१५ पासून सुरू असलेला स्टे आता संपुष्टात आला आहे. 

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अभिनेता सैफ अली खान, त्याची आई शर्मिला टागोर, बहिणी सोहा आणि सबा अली खान तसेच पतौडीची बहीण सबिहा सुलतान यांना शत्रू संपत्ती प्रकरणात अपीलीय अधिकाऱ्यांसमोर त्यांची बाजू मांडण्याचे आदेश दिले होते.

पतौडी कुटुंबाकडे उरलाय हा पर्याय -
अपीलीय अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेली ३० दिवसांची मुदत संपली आहे. एक महिन्याची मुदत संपल्यानंतरही, पतौडी कुटुंबाने कोणताही दावा सादर केलेला नाही. आता पतौडी कुटुंबाकडे डिव्हिजन बेंचमध्ये आव्हान देण्याचा पर्याय आहे.

सैफवर नुकताच झाला होता चाकू हल्ला -
एका व्यक्तीने १६ जानेवारीला चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानच्या वांद्रे येथील एका इमारतीतील घरात प्रवेश करून त्याच्यावर सहा वेळा चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला होता. त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफ पूर्णपणे बरा आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपी शरीफुल इस्लाम शहजादला अटक केली आहे. तो बांगलादेशचा नॅशनल कुस्तीपटू असल्याचे आणि त्याने बांगलादेशमध्ये राष्ट्रीय पातळीवर कुस्ती खेळल्याचे समोर आले आहे.
 

Web Title: Actor saif ali khan property can take by Madhya pradesh government in jabalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.