"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
By देवेंद्र जाधव | Updated: May 9, 2025 15:16 IST2025-05-09T15:15:44+5:302025-05-09T15:16:22+5:30
महेश मांजरेकर यांचा लेक सत्या मांजरेकर हा काही महिन्यांपूर्वी वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमात झळकणार होता. परंतु सध्या महेश यांनी मुलाला अभिनय करु नको असा सल्ला दिलाय. काय आहे यामागचं कारण

"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
महेश मांजरेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरबद्दल मनमोकळा खुलासा केला. याशिवाय सत्याला अभिनय करु नको, असं त्यांनी सांगितलंय. महेश मांजरेकर म्हणतात की, "सत्या खूप चांगला खूप आहे. तो सध्याच्या समाजात खूप मिसफिट आहे. त्याला कोणाबद्दल वाईट विचार करता येत नाहीत. त्याला काही झालं तर तो इमोशनल होतो. तो साधा आहे. शाळेत असल्यापासून त्याला ADHD आहे. शिकण्यामध्ये त्याला प्रॉब्लेम यायचा. पण तो खूपच भोळा आहे. तो ठरवून कोणालाच दुखावत नाही. चिडला तर खूप चिडतो. "
सत्याला अभिनय करु नको असा सल्ला
"तो आहे तसा मला आवडतो. तसाच पुढे तो राहावा. आम्ही दोघे मित्रासारखे आहोत. मी त्याला अभिनय करु नको असं सांगितलंय. मला वाटलं असतं ना की, हा जबरदस्त अभिनेता आहे तर मी त्याला समजावलं असतं. त्यामुळे पुढे काही होतंय का बघू. पण सध्या त्याला मी बिझनेस सांभाळायला सांगितला आहे. त्याने ऐकलं माझं. रात्री-अपरात्री कोणत्याही मुलाने मला हाक मारली तर मी त्यांच्यासाठी असतो. जेवढा टाईम लागतो मला त्याच्यापर्यंत पोहचायचा त्याच्यापेक्षा अर्ध्या वेळेत मी पोहचेन कारण मी गाडी फास्ट चालवतो. त्यामुळे मुलांच्या बाबतीत खूप पझेसिव्ह आणि सेंटिमेंटल आहे."
"जेव्हा त्यांना कोणी ट्रोल करतं ना तेव्हा माझी तार जाते. माझ्या काम केलेल्या पिक्चरबद्दल बोला. तुम्हाला नाही आवडलं तर काहीही बोला मला काय फरक पडत नाही. पण पर्सनल जाल तर मी तुम्हाला शोधेन. जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत तुम्हाला शोधेन. माझ्या मुलांना काही बोलायचं नाही. त्यांंचं काही घेणंदेणं नाही. तुम्ही त्यांना का ट्रोल करत आहात?" अशा शब्दात महेश मांजरेकरांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली.