फिटनेस फ्रिक अभिनेता, गेल्या १५ वर्षांपासून खात नाही 'हा' पदार्थ! तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 18:47 IST2025-08-20T18:36:56+5:302025-08-20T18:47:06+5:30

अभिनेत्याचा कमालीचा फिटनेस!'हा'डाएट प्लॅन करतो फॉलो

actor gurmeet choudhary reveals he hasn't eaten samosa for last 15 years know the reason | फिटनेस फ्रिक अभिनेता, गेल्या १५ वर्षांपासून खात नाही 'हा' पदार्थ! तुम्हीही कराल कौतुक

फिटनेस फ्रिक अभिनेता, गेल्या १५ वर्षांपासून खात नाही 'हा' पदार्थ! तुम्हीही कराल कौतुक

Actor Fitness: फिटनेस आणि आरोग्याकडे हल्ली प्रत्येकजण लक्ष देऊ लागला आहे.  सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रकार करताना दिसतात.मनोरंजनविश्वातील असाच एक अभिनेता ज्याच्या फिटनेसची सगळीकडे चर्चा होताना दिसते.हा अभिनेता म्हणजे गुरमीत चौधरी. गुरमीत स्वतःला फिट ठेवण्यासाठी आणि आपल्या बॉडीला शेपमध्ये ठेवण्यासाठी जिममध्ये रोज वर्कआऊट करतो. त्याचबरोबर डाएटकडेही तो विशेष लक्ष देतो. 


अलिकडेच गुरमीत चौधरीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली.या पोस्टद्वारे अभिनेत्याने त्याच्या फिटनेसचं रहस्य सांगितले आहे.आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर खास फोटो शेअर करत गुरमीतने त्याला कॅप्शन देत म्हटलंय," मला आठवतंय जवळपास १५ वर्षांपूर्वी मी शेवटचा समोसा खाल्ला असेन. खरं सांगायचं तर मला आता समोसा खाण्याची इच्छाही होत नाही."

त्यानंतर पुढे त्याने म्हटलंय, "मथुरेमध्येही असताना मी तिथला प्रसिद्ध पेढा खाण्याचं टाळलं. हे सगळं माझ्यासाठी कठीणच आहे, पण माझ्यासाठी फिटनेस ही एक जीवनशैली आहे.त्यामुळे फिटनेसच्या बाबतीत कायम जागरुक राहा." असा सल्लाही त्याने चाहत्यांना दिला आहे.

वर्कफ्रंट

‘रामायण’ मालिकेतून लोकप्रियता मिळवलेल्या गुरमीत चौधऱीला आजही लोक टीव्हीवरचा राम म्हणूनच ओळखतात.वेगवेगळ्या मालिका, चित्रपटांमधून धाटणीच्या भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवंल.‘खामोशियां’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

Web Title: actor gurmeet choudhary reveals he hasn't eaten samosa for last 15 years know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.