अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 16:17 IST2025-07-27T16:16:29+5:302025-07-27T16:17:03+5:30

सिनेमा येणार की नाही? अभिनेता म्हणाला...

actor dibyendu bhattacharya talks about anushka sharma starrer chakda express movie jhulan goswami biopic | अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बऱ्याच काळापासून स्क्रीनपासून दूर आहे. वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का संसारात रमली. गेल्या वर्षी तिने मुलालाही जन्म दिला. अनुष्का पुन्हा मोठ्या पडद्यावर कधी दिसणार याची कोणालाच कल्पना नाही. काही वर्षांपूर्वी 'चकदा एक्सप्रेस' या सिनेमात अनुष्का झुलन गोस्वामीती भूमिका साकारत होती. सिनेमाचा फर्स्ट लूकही समोर आला होता. मात्र नंतर या सिनेमाबद्दल पुढे काहीच अपडेट आलं नाही. हा सिनेमा डबाबंद झाला अशीही चर्चा झाली. आता सिनेमातील एका अभिनेत्यानेच यावर भाष्य केलं आहे.

'न्यूज १८ शोशा'ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता दिव्येंदु भट्टाचार्य (Dibyendu Bhattacharya) म्हणाला, "तुम्हाला विश्वास बसणार नाही पण मी सुद्धा या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. मी नेहमी लोकांना सांगतो की हा सिनेमा खूप दमदार बनला आहे. दिग्दर्शक प्रोसित रॉयच्या घरी मी हा सिनेमा पाहिला. मी त्यांना म्हणालो की 'सिनेमा अजून रिलीज होत नाहीये कमीत कमी मला तरी दाखवा.' तेव्हा ते म्हणाले की 'सिनेमा पूर्णपणे शूट झालेला नाही. अजून काम बाकी आहे.' पण मी तो पाहिला..खूपच सुंदर बनला आहे."


तो पुढे म्हणाला, "अनुष्का शर्माचा सर्वोत्तम अभिनय या सिनेमात पाहायला मिळतो. तिने खूप चांगलं काम केलं आहे. सिनेमा रिलीज का होत नाहीये हे मला माहित नाही. माझ्याकडे सिनेमाबद्दल काहीही माहिती असती तर मी लगेच सांगितली असती. पण मला खरोखर माहित नाही. एका बाजूला क्लीन सेट आणि दुसऱ्या बाजूला नेटफ्लिक्स आहे. दोघांमध्ये काय चाललंय काहीच कळत नाहीये. याचा प्रेक्षकांवरही परिणाम होत आहे आणि आर्थिक नुकसानही आहे. एक कलाकार म्हणून मला असंच वाटतं की सिनेमा रिलीज व्हायला पाहिजे. कारण कोणत्याही सिनेमामागे अनेक लोकांची मेहनत असते. हा एक लांबलचक आणि भावनिकरित्या शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा सिनेमा आहे."

अनुष्का शर्माने २०२२ साली 'चकदा एक्सप्रेस' कमबॅक सिनेमा म्हणून घोषणा केली होती. अनुष्काच्याच 'क्लीन स्लेट' प्रोडक्शनने याची निर्मिती केली होती. मात्र गेल्या वर्षीच अनुष्काने आपल्या प्रोडक्शन हाऊसमधून पायउतार झाली आणि आपल्या भावाकडे तिने जबाबदारी सोपवली.

Web Title: actor dibyendu bhattacharya talks about anushka sharma starrer chakda express movie jhulan goswami biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.