Video - पत्नीने अॅक्टर पतीला गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रंगेहाथ पकडलं, भररस्त्यात केली यथेच्छ धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 11:04 IST2022-07-25T10:54:12+5:302022-07-25T11:04:26+5:30
Actress Prakriti Mishra Video : नॅशनल अवॉर्ड विजेती ओडिया अभिनेत्री प्रकृती मिश्रा हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Video - पत्नीने अॅक्टर पतीला गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रंगेहाथ पकडलं, भररस्त्यात केली यथेच्छ धुलाई
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने घडत असतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. नॅशनल अवॉर्ड विजेती ओडिया अभिनेत्री प्रकृती मिश्रा हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्रीला मारहाण झाल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्रीचा सहकलाकार बाबूशान मोहंतीच्या पत्नी तृप्ती हिने प्रकृती मिश्राला मारहाण केल्याचं समोर आलं आहे. मोहंतीने प्रकृतीसह ओडिया चित्रपट प्रेमममध्ये काम केलं होतं. त्यानंतर आपल्या पतीचं प्रकृतीसह अफेअर असल्याचा पत्नीला संशय होता.
पत्नीने आपल्या अॅक्टर पतीला गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये रंगेहाथ पकडल्यावर तिने दोघांची यथेच्छ धुलाई केली. हा सर्व प्रकार सध्या सोशल मीडिय़ावर तुफान व्हायरल होत आहे. रस्त्यावर झालेलं हे भांडण सध्या चर्चेचं विषय ठरलं आहे. मोहंतीची पत्नी तृप्तीने आपला पती आणि अभिनेत्रीला कारमध्ये एकत्र पकडलं. यानंतर ती मारहाण करताना दिसली. जेव्हा प्रकृती तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होती, तर तृप्तीने तिचे केस आणि कपडे पकडण्याचा प्रयत्न केला. तिने प्रकृतीला रिक्षात बसण्यापासूनही रोखलं.
#WATCH || #Ollywood actor #Babushaan Mohanty has landed in trouble after his wife caught him with his co-actress #PrakrutiMishra at Laxmisagar area in #Bhubaneswar this morning. pic.twitter.com/dmmBmL0Nvw
— Prameya English (@PrameyaEnglish) July 23, 2022
प्रकृतीची आई कृष्णाप्रिया मिश्रा यांनी काही तासानंतर खारवेला नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही जणांनी प्रकृती मिश्राची गाडी थांबवली आणि तिला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला. त्यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे. प्रकृतीने आपल्या जबाबात प्रत्येक कथेचे दोन पैलू असतात. दुर्देवाने आपण अशा समाजात राहतो जेथे ऐकण्यापूर्वीच आपण महिलेला दोष देतो असं म्हटलं आहे.
"मी आणि माझा सहकलाकार बाबूनाथ चेन्नईतील एक कार्यक्रमासाठी जात होतो, याच दरम्यान बाबूनाथ मोहंतीची पत्नी तृप्ती काही गुंडासोबत आली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. मला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला. या प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाईल, असा मला विश्वास आहे" असं देखील प्रकृतीने म्हटलं आहे. नॅशनल अवॉर्ड मिळालेल्या अभिनेत्रीला भररस्त्यात अशी मारहाण झाल्याने बघण्यासाठी लोकांनी देखील गर्दी केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.