विक्रम भट यांच्या अनुसार जरीन ही सर्वात अधोमुल्यित अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2016 15:39 IST2016-06-14T10:09:17+5:302016-06-14T15:39:17+5:30

आपल्या कारकीर्दीत अनेक हॉरर मुव्हीज करणारे, चित्रपट निर्माते विक्रम भट यांच्या अनुसार जरीन खान ही सर्वात अधोमुल्यित अभिनेत्री आहे.  ...

According to Vikram Bhat, Jharan is the most understudy actress | विक्रम भट यांच्या अनुसार जरीन ही सर्वात अधोमुल्यित अभिनेत्री

विक्रम भट यांच्या अनुसार जरीन ही सर्वात अधोमुल्यित अभिनेत्री

ल्या कारकीर्दीत अनेक हॉरर मुव्हीज करणारे, चित्रपट निर्माते विक्रम भट यांच्या अनुसार जरीन खान ही सर्वात अधोमुल्यित अभिनेत्री आहे. 
विक्रम भट यांच्या १९२१ या चित्रपटात ती काम करते आहे. उत्तर लंडनमध्ये याची शुटींग असणार आहे. ‘सध्या आम्ही जरीनचे नाव फक्त अधिकृत केले आहे. चित्रपटात ती अभिनेत्रीची भूमिका करणार आहे. अभिनेत्यासाठीचा आमचा शोध सुरू आहे. मी तिला हेट स्टोरी ३ मध्ये पाहिले होते. ती खूप छान करते. तिच्या कामाचे मुल्यांकन अद्याप झाले नसल्याचे मला वाटते, असे भट यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
१९२० चे चित्रपट एका विशिष्ट कालावधीतील असून, आम्हाला विशिष्ट दिसणारे कलाकार हवे आहेत. त्यावेळची शरीरयष्टी, शरीरभाषा आम्हाला हवी असल्याने आम्ही योग्य कलाकारांच्या शोधात आहोत. 
१९२१ ही रोमँटिक स्टोरी आहे. हा चित्रपट म्हणजे १९२० २.० असेही म्हणता येतील. १९२० ची मालिका करण्यात काही चूक नाही. १९२१ मध्ये खूप जबरदस्त रोमान्स आणि लव्ह स्टोरी असेल, असेही भट म्हणाले.
यापूर्वी विक्रम भट यांनी १९२०, १९२० एव्हिल रिटर्नस् आणि १९२० लंडन हे चित्रपट केले आहेत.






Web Title: According to Vikram Bhat, Jharan is the most understudy actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.