'राजू बन गया जेंटलमन'साठी आमिर खान होता पहिली चॉईस, सेटवर शाहरुख खानला बघून जुही चावला झाली होती हैराण

By गीतांजली | Updated: December 8, 2020 10:44 IST2020-12-08T10:41:49+5:302020-12-08T10:44:48+5:30

राजू बन गया जेंटलमन' हा शाहरुख खान आणि जुही चावलाच्या जोडीचा सिनेमा हिट ठरला होता.

Aamir khan was the first choice for raju ban gaya gentleman movie juhi chawla was shocked to see shahrukh khan first time | 'राजू बन गया जेंटलमन'साठी आमिर खान होता पहिली चॉईस, सेटवर शाहरुख खानला बघून जुही चावला झाली होती हैराण

'राजू बन गया जेंटलमन'साठी आमिर खान होता पहिली चॉईस, सेटवर शाहरुख खानला बघून जुही चावला झाली होती हैराण

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान आणि काजोलची जोडी बॉलिवूडच्या सुपरहिट जोड्यांपैकी एक आहे. त्यांनी एकत्र केलेले सर्व सिनेमा  हिट ठरले आणि प्रेक्षकांनाही त्यांची जोडी खूप आवडली. शाहरुख खान आणि जुही चावलाची जोडीही प्रेक्षकांना भावली.. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या पहिल्या सिनेमाशी निगडीत एक खास किस्सा सांगणार आहोत.


हा होता जुही आणि शाहरुख खानचा पहिला सिनेमा 
'राजू बन गया जेंटलमन'मध्ये शाहरुख खान आणि जुही चावलाने पहिल्यांदा एकत्र काम केले होते. हा सिनेमा हिट ठरला होता. त्यानंतर दोघांनीही बर्‍याच सिनेमांमध्ये एकत्र काम केले. पण तुम्हाला माहिती आहे काय शाहरुख या सिनेमासाठी पहिली पसंती नव्हता. त्याऐवजी आमिर खानची निवड करण्यात आली होती. राजू बन गया जेंटलमन सिनेमासाठी निर्माता आणि दिग्दर्शकांनी आमिर खानला विचारले होते. आमिर खानने हा चित्रपट करण्यास नकार दिला मग विवेक मुशरानला विचारले मात्र तिकडे ही काही तरी बिनसले आणि मग या सिनेमात शाहरुख खानची एंट्री झाली.

जुही चावला झाली होती हैराण
शाहरुख खानसोबत झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा एका मुलाखती दरम्यान  जुही चावलाने सांगितला होता. ती म्हणाली, आमिर खानसारखा दिसणारा अभिनेता सोबत तुला या सिनेमात काम करायचे आहे. जेव्हा जुहीने त्याला पाहिले तेव्हा तिला आश्चर्य वाटले कारण शाहरुख अमीर खानसारखा अजिबात  नव्हता. पण हळूहळू जेव्हा दोघांचे बोलणे झाले तेव्हा ती शाहरुखसोबत कंफर्टेबल झालीय. 
 

Web Title: Aamir khan was the first choice for raju ban gaya gentleman movie juhi chawla was shocked to see shahrukh khan first time