'सितारे जमीन पर' नंतर येणार 'PK 2'? आमिर खान म्हणाला- "पीकेचा सीक्वल..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 18:07 IST2025-06-09T18:06:42+5:302025-06-09T18:07:25+5:30

'सितारे जमीन पर'ची चर्चा असतानाच आमिरचा आणखी एक गाजलेला सिनेमा म्हणजे 'पीके'चा सीक्वल येणार असल्याचंही बोललं जात आहे. 'पीके २'बाबत आता खुद्द आमिर खाननेच भाष्य केलं आहे. 

aamir khan talk about pk 2 said no such plans on pk sequel | 'सितारे जमीन पर' नंतर येणार 'PK 2'? आमिर खान म्हणाला- "पीकेचा सीक्वल..."

'सितारे जमीन पर' नंतर येणार 'PK 2'? आमिर खान म्हणाला- "पीकेचा सीक्वल..."

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या 'सितारे जमीन पर' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. तारे जमीन पर या गाजलेल्या सिनेमाचा 'सितारे जमीन पर' हा सीक्वल आहे. 'सितारे जमीन पर'ची चर्चा असतानाच आमिरचा आणखी एक गाजलेला सिनेमा म्हणजे 'पीके'चा सीक्वल येणार असल्याचंही बोललं जात आहे. 'पीके २'बाबत आता खुद्द आमिर खाननेच भाष्य केलं आहे. 

२०१४ साली प्रदर्शित झालेला 'पीके' सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमाच्या शेवटी रणबीर कपूरची एन्ट्री होत असल्याने 'पीके २'बाबत तेव्हापासूनच चर्चा रंगली होती. 'पीके'नंतर प्रेक्षक 'पीके २'च्या प्रतिक्षेत आहेत. पण, यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. कारण, 'पीके'चा सीक्वल सध्या तरी येत नसल्याचा खुलासा आमिरने केला आहे. सितारे जमीन परच्या निमित्ताने आमिरने पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा 'पीके'च्या सीक्वलबाबत बोलताना आमिर म्हणाला, "सध्या तरी फक्त तारे जमीन परचा सीक्वल येत आहे. त्यामुळे पीकेचा सीक्वल येत नाहीये. या फक्त अफवा आहेत. माझ्यात आणि राजकुमार हिराणींमध्ये याबाबत चर्चा झालेली नाही. आम्ही असा कोणताही प्लॅन केलेला नाही".

दरम्यान, आमिर खानचा 'सितारे जमीन पर' सिनेमा येत्या २० जूनला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या सिनेमात आमिरसोबत जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकेत आहे. 'सितारे जमीन पर'मध्ये आमिर फुटबॉल कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमातून १० दिव्यांग मुलांची गोष्ट दाखविण्यात येणार आहे. 

Web Title: aamir khan talk about pk 2 said no such plans on pk sequel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.