आमिरने केले '२४'चे कौतुक

By Admin | Updated: June 9, 2016 16:34 IST2016-06-09T13:06:15+5:302016-06-09T16:34:37+5:30

अभिनेता आमिर खानने '२४'मालिकेचे कौतुक केले असून मालिकेच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Aamir has done '24' appreciation | आमिरने केले '२४'चे कौतुक

आमिरने केले '२४'चे कौतुक

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - अभिनेता अनिल कपूरने '२४' मालिकेच्या माध्यमातून टीव्हीवर पदार्पण केले. या मालिकेचा पहिला सीझन खूप गाजला, प्रेक्षकांचीही खूप पसंती मिळाली. आता तीन वर्षांनंतर या मालिकेचा पुढचा सीझन येणार असून नुकताच एका सोहळ्यात त्याचा ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी अनिल कपूर, सुरवीन चावला, आशिष विद्यार्थी, अमृता खानविलकर या मालिकेतील कलाकारांसह मालिकेचा दिग्दर्शक अभिनय देव आणि मि.परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानही उपस्थित होता. 
या मालिकेचे दिग्दर्शन, लूक, बँकग्राऊंड स्कोअर या सर्व गोष्टींचे त्याने खूप कौतुक केले. छोट्या पडद्यावर अशा प्रकारची मालिका असू शकते यावर त्याने आश्चर्य व्यक्त करतानाच हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. तसेच या मालिकेच्या यशासाठी त्याने शुभेच्छाही दिल्या. 
 

Web Title: Aamir has done '24' appreciation