'डॉक्टर अब्दुल कलाम यांची अडचण झाली..'; मिलिंद गवळींनी डॉ. अब्दुल कलाम यांचं उदाहरण देत शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 03:19 PM2023-05-01T15:19:16+5:302023-05-01T15:19:54+5:30
Milind gawali: मिलिंद गवळी यांनी एखाद्या व्यक्तीची विचारसरणी, त्याचा साधेपणा याविषयी भाष्य केलं आहे. यावर भाष्य करत असताना त्यांनी डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा उल्लेख केला आहे.
उत्तम अभिनयशैलीमुळे कायम चर्चेत राहणारा अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी ( milind gawali). सध्या 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत ते महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांची वरचेवरच चर्चा रंगत असते. यातच ते सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. त्यामुळे बऱ्याचदा ते त्यांच्या प्रोफेशनल वा वैयक्तिक जीवनातील किस्से, घटना चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात अलिकडेच त्यांनी महागडे कपडे, एखाद्या व्यक्तीची विचारसरणी, त्याचा साधेपणा याविषयी भाष्य केलं आहे. यावर भाष्य करत असताना त्यांनी डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा उल्लेख केला आहे.
"ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, आणि ज्यांना कपड्यांची आवड आहे, ते घेतात असे कपडे, Mulberry silk, जगात सगळ्यात महाग कापड Kanjeevaram silk, या साड्या खूप महाग असतात. Muga silk हे घ्यायला खूप पैसे मोजावे लागतात. “विकून लोकर “the most expensive and luxurious fabric in the world. Vicuna Wool comes from Peru. या ची किंमत? या अशा कपड्यांची किंमत विचारूची नसते.पण कधी कधी तुमचं काम असं असतं की तुम्हाला कपडे विकत घ्यावेच लागतात, विशिष्ट प्रकारचे कपडे तुम्हाला घालावेच लागतात, तुमच्या कामाचं स्वरूप असं असतं की तुम्हाला त्या पद्धतीचेच कपडे घालून ते काम करावे लागतात, जसं कॉर्पोरेट ऑफिसमध्ये ट्राऊझर, फॉर्मल शर्ट, फॉर्मल शूज, काही ना टाय घालावा लागतो तर काहींना सूट पण घालावा लागतो, काहींचं काम वेगळं असतं, जसा अमेरिकन वर्किंग क्लाससाठी जीन्सचा शोध लागला, jeans हा प्रकार जगभरामध्ये आता सगळीकडे वापरला जातो, working class पण आणि fashion म्हणून पण. हे झालं सगळं जनरल , common पण अन कॉमन वेगळी माणसं असतातच की, मग अशी काही माणसं डोळ्यासमोर येतात, हि माणसं फार वेगळी असतात, उदाहरणार्थ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, ज्या वेळेला ते आपल्या देशाचे प्रेसिडेंट झाले, राष्ट्राध्यक्ष झाले, त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला आता बंद गला suit तुम्हाला घालणं compulsory आहे, dress code, आयुष्यभर शर्ट आणि पॅन्ट घातलेल्या माणसाला अचानक बंदगला suit जोधपुरी सारखा सूट घालायचा म्हणजे, आली खा पंचायत. डॉक्टर अब्दुल कलाम यांची अडचण झाली आता गळ्याचे बटन लावून भाषण करायचं त्यांना फार कठीण जाणार असं त्यांना वाटलं, त्यांनी टेलरला सांगितलं, - “My colleagues say that it chokes the throat. I don’t want my throat to get choked and I can’t express my views and thoughts.” असा बंद गळा सूट बनव की ज्याचा गळा बंद नको आहे मला, कशा पद्धतीने तो सूट बनवला गेला आणि आता त्याला अब्दुल कलाम सूट असं म्हटलं जातं , ज्याचा गळा बंद नाही", असं मिलिंद गवळी म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "आपल्या देशाचे काही प्रेसिडेंट रिटायर झाल्यानंतर ट्रक ट्रक भरून सामान दिल्ली वरून त्यांच्या बंगल्यात घेऊन आले होते ( नंतर ते त्यांना परत करावं लागलं होतं) पण डॅाक्टर कलाम was an exception, an inspiration & Great human पण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम गेले त्यावेळेला त्यांच्याकडे 2,500 books, a wrist watch, 6 shirts, 4 trousers, 3 suits and a pair of shoes एवढेच कपडे होते. हे एक उत्तम उदाहरण आहेत की शक्तिशाली व्यक्तिमत्वाच्य साठी अतिरिक्त वस्त्र आवश्यक नाहीत. यालाच म्हणतात साधी राहणी उच्च विचारसरणी."
दरम्यान, त्यांच्या या पोस्टमधून त्यांनी माणसाने कितीही यश, पैसा, प्रसिद्ध गाठली तरीदेखील त्याच्यातील साधेपणा जपायला हवा हे सांगायचा प्रयत्न केला आहे. सोबतच त्यांनी त्यांच्या फोटोशूटचा एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये त्यांची चर्चा होत आहे.