अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सभा रविवारी

By अभिनय खोपडे | Published: September 24, 2022 07:14 PM2022-09-24T19:14:48+5:302022-09-24T19:15:37+5:30

सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य संघटनांची संयुक्त सभा होणार

A. Bh. Planning meeting of Marathi Sahitya Sammelan on Sunday | अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सभा रविवारी

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची सभा रविवारी

googlenewsNext

वर्धा: आगामी ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात वर्धानगरीत आयोजित असून संमेलनाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य संस्थांची संयुक्त सभा रविवार, दि. २५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

वर्धानगरीत यापूर्वी १९६९ साली ज्येष्ठ साहित्यिक पु. शि. रेगे यांच्या अध्यक्षतेखाली ४८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वावलंबी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. ही संधी पुन्हा एकदा वर्धेकरांना प्राप्त झाली असून त्यासंदर्भात आयोजित सभेला अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे व विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय पदाधिकारी उपस्थिती राहणार आहेत. या पहिल्या सभेत अखिल भारतीय संमेलनाची पार्श्वभूमी, व्यापकता, आयोजनाबाबतची सद्यस्थिती, विविध सामाजिक, सांस्कृतिक व साहित्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका, अपेक्षा व सूचना, स्वागत समिती तसेच स्थानिक पातळीवरील विविध समित्यांचे गठण, संयुक्त सहभाग आदी विषयांवर सर्वांगीण चर्चा करण्यात येणार आहे. या सभेत मांडल्या जाणाऱ्या सूचनांची नोंद घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळासमोर सदर सूचना ठेवल्या जातील. याशिवाय, अल्पावधीतच दुसरी सभा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार आहे.

रविवारी आयोजित या सभेत जिल्ह्यातील साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन विदर्भ साहित्य संघाकडून यांनी केले आहे.

Web Title: A. Bh. Planning meeting of Marathi Sahitya Sammelan on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.