मराठी सिनेमांत २५० कोटींची गुंतवणूक

By Admin | Updated: July 1, 2015 03:57 IST2015-07-01T03:57:35+5:302015-07-01T03:57:35+5:30

२५० कोटी... तेही मराठी सिनेमासाठी. दचकलात ना! हो पण मराठी सिनेमामध्ये येत्या ५ वर्षांत २५० कोटी रुपयांची गुंतवणूक सिनेनिर्मिती क्षेत्रात करणार असल्याची घोषणा

250 crores investment in Marathi cinema | मराठी सिनेमांत २५० कोटींची गुंतवणूक

मराठी सिनेमांत २५० कोटींची गुंतवणूक

२५० कोटी... तेही मराठी सिनेमासाठी. दचकलात ना! हो पण मराठी सिनेमामध्ये येत्या ५ वर्षांत २५० कोटी रुपयांची गुंतवणूक सिनेनिर्मिती क्षेत्रात करणार असल्याची घोषणा निर्माती-दिग्दर्शिका नंदिता सिंघा यांनी केली आहे. अनेक हिंदी चित्रपट करणाऱ्या निर्मात्या -दिग्दर्शिका नंदिता सिंघा आता मराठी चित्रपटनिर्मितीत पदार्पण करीत आहेत. मराठीतील जुन्या सिनेमांची पुनर्निर्मिती करून ते केवळ विदेशी चित्रपट महोत्सवात दाखवण्यापुरतेच न ठेवता त्यांना जागतिक बाजारपेठ प्रदर्शित करण्यासाठी अभिजात मराठी, क्लासिक मराठी जुन्या चित्रपटांची आणि श्रवणीय गाण्यांची पुनर्निर्मिती करण्यावर आपला भर राहील, त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व स्तरांवरील प्रतिभावंत कलाकार यांना संधी देणार आहे, असे त्या म्हणाल्या.

Web Title: 250 crores investment in Marathi cinema