२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:17 IST2025-10-28T11:10:14+5:302025-10-28T11:17:27+5:30

Sachin Chandwade Death : 'जमतारा २' वेबसीरीजमध्ये आपल्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता सचिन चंदवाडे याने आत्महत्या केली. त्याने जळगावमधील त्याच्या घरी गळफास लावला. त्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

25-year-old Marathi actor sachin chandwade's last post before suicide goes viral, fans are shocked | २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले

Sachin Chandwade Death: 'जमतारा २' वेबसीरीजमध्ये आपल्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता सचिन चंदवाडे (Sachin Chandwade) याने आत्महत्या केली. त्याने जळगावमधील त्याच्या घरी गळफास लावला. त्याच्या मृत्यूच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. २५ वर्षीय या अभिनेत्याने निधन होण्याच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर सर्वजण शोक व्यक्त करत आहेत.
सचिन चंदवाडेने इंस्टाग्रामवर त्याची शेवटची पोस्ट त्याच्या आगामी मराठी चित्रपट 'असुरवन'बद्दल केली होती. सचिन रामचंद्र मंगो लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात ते सोमाची भूमिका साकारणार होते. ही पोस्ट त्याच्या आत्महत्येच्या एक दिवसापूर्वीची आहे.


सचिन चंदवाडेने स्वतःच्या पोस्टर व्यतिरिक्त त्याचे सहकलाकार पूजा मोइली आणि अनुज ठाकरेचे मोशन पोस्टर देखील शेअर केले होते. रहस्यांनी भरलेल्या एका भयानक जंगलात उभे असलेले सर्व कलाकार घाबरलेले दिसत होते. २५ वर्षांच्या सचिनच्या अचानक निधनाने कुटुंब आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, सचिन चंदवाडेच्या कुटुंबीयांनी त्याला पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्याला तातडीने त्याच्या गावाजवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. खूप प्रयत्न करूनही, २४ ऑक्टोबरच्या रात्री सुमारे १:३० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याने आत्महत्या का केली, याचा खुलासा होऊ शकलेला नाही. रिपोर्ट्सनुसार, परोळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सचिन मराठी अभिनेता होता. तो पुण्याच्या आयटी क्षेत्रात नोकरीही करत होता.
 

Web Title : मराठी अभिनेता सचिन चंदवाडे की आत्महत्या से पहले की आखिरी पोस्ट वायरल

Web Summary : 'जामतारा 2' के लिए जाने जाने वाले अभिनेता सचिन चंदवाडे ने जलगांव में आत्महत्या कर ली। मरने से पहले, उन्होंने अपनी आगामी मराठी फिल्म 'असुरवन' के बारे में एक पोस्ट साझा की। 25 वर्षीय अभिनेता के निधन से परिवार और प्रशंसक सदमे में हैं। पुलिस मौत के कारणों की जांच कर रही है।

Web Title : Marathi Actor Sachin Chandawade's Last Post Viral Before Suicide

Web Summary : Actor Sachin Chandawade, known for 'Jamtara 2,' died by suicide in Jalgaon. Before his death, he shared a post about his upcoming Marathi film 'Asuravan'. The 25-year-old's sudden demise has shocked family and fans. Police are investigating the cause of death.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.