बायोपिक करायचं म्हणून २५ वेळा पाहिला ‘अलबेला’

By Admin | Updated: June 22, 2016 01:39 IST2016-06-22T01:39:33+5:302016-06-22T01:39:33+5:30

भगवानदादांची ती स्टाईल, ते एक्स्प्रेशन, त्यांची ती नृत्याची शैली आत्मसात करण्यासाठी अलबेला हा चित्रपट मी एक, दोन नव्हे तर तब्बल २५ वेळा पाहिला अ

25 times seen as a biopic 'Albela' | बायोपिक करायचं म्हणून २५ वेळा पाहिला ‘अलबेला’

बायोपिक करायचं म्हणून २५ वेळा पाहिला ‘अलबेला’

भगवानदादांची ती स्टाईल, ते एक्स्प्रेशन, त्यांची ती नृत्याची शैली आत्मसात करण्यासाठी अलबेला हा चित्रपट मी एक, दोन नव्हे तर तब्बल २५ वेळा पाहिला असल्याचे अभिनेता मंगेश देसाई यांनी ‘लोकमत’ आॅफिस भेटीदरम्यान सांगितले.
मंगेश म्हणाला, मी खूप लहान असताना शनिवार, रविवारी ब्लॅक व्हाइट टीव्हीवर भर गर्दीत बसून भगवानदादांचा अलबेला हा चित्रपट पाहिला होता. लग्नसोहळे वगैरे असेल तर भगवानदादांच्या भोली सुरत दिल के खोटे या गाण्यांवरदेखील भरपूर डान्स केला आहे. पण आज प्रत्यक्षात त्यांची भूमिका करायला मिळणे ही माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. तसेच भगवानदादांसारखे हुबेहुब दिसण्याची लकब ही दिग्दर्शक शेखर सरतांडेल, मेकअपमन विद्याधर भट्टे व कॅमेरामन यांच्या प्रयत्नांमुळे झाली असल्याचेदेखील या वेळी मंगेश देसाई यांनी सांगितले.
२४ जूनला प्रदर्शित होणारा भगवानदादांच्या जीवनावर आधारित असणारा एक अलबेला या चित्रपटात भगवानदादांची भूमिका मंगेश देसाई यांनी साकारली आहे. तर गीता बालीच्या भूमिकेत विद्या बालन पाहायला मिळणार आहे.

Web Title: 25 times seen as a biopic 'Albela'