ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल

By Admin | Updated: May 28, 2015 15:03 IST2015-05-28T15:01:44+5:302015-05-28T15:03:57+5:30

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना बुधवारी रात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे.

Veteran actor Dharmendra hospital | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र रुग्णालयात दाखल

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ - ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना बुधवारी रात्री प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. 

गेल्या काही दिवसांपासून धर्मेंद यांना अति थकवा जाणवत होता. बुधवारी हा त्रास वाढल्याने त्यांना रात्री उशीरा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. २०१० मध्येही धर्मेंद्र यांना याच कारणावरुन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धर्मेंद्र यांनी चुपके चुपके, शोले अशा एका पेक्षा एक चित्रपटांनी सिनेरसिकांवर छाप पाडली आहे.  भाजपा खासदार हेमा मालिनी या त्यांच्या पत्नी असून धर्मेंद्र यांना सनी देओल, बॉबी देओल, इशा देओल, आहाना देओल,विजेता देओल व अजेईता देओल ही सहा मुलं आहेत. 

 

Web Title: Veteran actor Dharmendra hospital