Sumitra Bhave's close relationship with Kolhapur | सुमित्रा भावे यांचा कोल्हापूरशी जिव्हाळ्याचा संबंध

सुमित्रा भावे यांचा कोल्हापूरशी जिव्हाळ्याचा संबंध

ठळक मुद्दे सुमित्रा भावे यांचा कोल्हापूरशी जिव्हाळ्याचा संबंधचंद्रकांत जोशी आणि दिलिप बापट यांनी दिला आठवणींना उजाळा

कोल्हापूर : ज्येष्ठ दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि कोल्हापूरशी अतिशय जवळचा आणि अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता. ज्येष्ठ दिग्दर्शक सुमित्रा भावे आणि कोल्हापूरशी अतिशय जवळचा आणि अतिशय जिव्हाळ्याचा संबंध होता, विशेषत: कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीच्या सर्व कार्यक्रमात त्या सहभागी होत्या. त्यांच्या आठवणींना सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी आणि कार्यवाह दिलिप बापट यांनी उजाळा दिला.

भावे यांच्या वास्तुपुरूष चित्रपटाने २००२ मध्ये फिल्म सोसायटीची स्थापना झाली. त्यानंतर कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सुरूवात झाली, तेव्हा दरवर्षी त्यात त्यांचा चित्रपट मराठी विभागात हमखास असे आणि त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान प्रेक्षक पसंती व निवड समिती व्दारा मिळत असे.

दहावी फ, नितळ, देवराई, भारत माझा देश आहे, संहिता, देवराई, कासव, अखेरचा दिठी असे अनेक चित्रपट सोसायटीने दाखवले. २०१७ मध्ये बाबुराव पेंटर स्मृती पुरस्काराने सुमित्रा भावे यांना फेस्टिव्हलमध्ये सन्मानित करण्यात आले. त्यांच्याशी चित्रपट व समाज यावर नेहमी चर्चा होत असे. 

 

आयनॉक्समध्ये महोत्सव दाखवण्यास सुरुवात झाल्यानंतर २०१९ मध्ये दिठी हा त्यांचा अजून प्रदर्शित न  झालेला  चित्रपटही  सोसायटीने  दाखवला होता.  यावेळी  सुमित्रा भावे यांंचा उद्योगपती नीतिन वाडीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. यावेळी उद्योगपती व्ही. बी. पाटील, अभिनेता किशोर कदम, निर्माते  डॉ.  मोहन आगाशे उपस्थित होते. या कार्यक्रमात सुमित्रा भावे यांनी कोल्हापूरातील सिनेरसिकांशी चांगला संवाद साधला. दिठीमध्ये अभिनेता किशोर  कदम यांनी सुंदर भूमिका केल्याचा तसेच सिनेमाला  निर्माता  मिळत  नव्हता,  तेव्हा  डॉ.  मोहन  आगाशे  यांनी  स्वत:  या  सिनेमाची निर्मिती  केल्याची  माहीती  स्वत:  सुमित्रा भावे यांनी दिली होती. 

सुमित्राताईंचा ऋणानुबंध जितका कोल्हापूरशी आला त्यात फिल्म सोसायटीचा सहभाग खूप जास्ती होता म्हणले तर चुकणार नाही. कोल्हापूरवर त्यांचे विशेष प्रेम होते. मृदू आवाजात पण ठामपणे त्या आपल्या चित्रपटाबद्दल मते व्यक्त करत. कासव चित्रपटावर फिल्म सोसायटीने चर्चा घडविली असता त्या जाणीवपूर्वक कोल्हापुरात येऊन चर्चेत सहभागी झाल्या, असे मत ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी व्यक्त केले तर प्रयोगशील, समाजभान असणाऱ्या लेखिका, पटकथाकार, दिग्दर्शका म्हणून त्यांच्याबद्दल फिल्म सोसायटीला आदर असून त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशा शब्दा दिलिप बापट यांनी सुमित्राताईना आदरपूर्वक श्रध्दांजली वाहिली.

Web Title: Sumitra Bhave's close relationship with Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.