South Moive Actor Jaya Prakash Reddy passes away due to heart attack | Jaya Prakash Reddy: साऊथ सिनेमातील अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Jaya Prakash Reddy: साऊथ सिनेमातील अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई – साऊश सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते जयप्रकाश रेड्डी(Jayprakash Reddy) यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. आंध्रप्रदेशच्या गुंटूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने जयप्रकाश रेड्डी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. तेलुगु सिनेमाचे प्रेक्षक जयप्रकाश रेड्डी यांना कॉमेडी एक्टर म्हणून ओळखत असे. त्यांनी ब्रम्हपुत्रुदू या सिनेमापासून आपलं करिअर सुरु केले होते.

जयप्रकाश रेड्डी यांच्या निधनानं टॉलिवूड सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनीही त्यांच्या निधानाने शोक व्यक्त केला आहे. आंधप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी जयप्रकाश रेड्डी यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार जयप्रकाश रेड्डी यांना बाथरुममध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. रेड्डी हे कुर्नूलच्या अल्लागड्डा येथील आहेत. १९८० पासून त्यांनी अनेक सिनेमात काम केले होते. अलीकडे साऊथचे सिनेमे हिंदीमध्ये डब करुन दाखवले जातात. यात जयप्रकाश रेड्डी यांची भूमिका हमखास प्रेक्षकांना पाहायला मिळत असते. आज दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. तेलुगु सिनेमात त्यांना जेपी नावाने ओळखलं जायचं.

Web Title: South Moive Actor Jaya Prakash Reddy passes away due to heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.