Salman's friendship will not help to win the Big Boss - Vikal Bhalla | बिग बॉस जिंकण्यासाठी सलमानच्या मैत्रीचा फायदा होणार नाही - विकास भल्ला
बिग बॉस जिंकण्यासाठी सलमानच्या मैत्रीचा फायदा होणार नाही - विकास भल्ला
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - दिलदार अभिनेता अशी ओळख असलेला अभिनेता सलमान खान एक चांगला दोस्तही आहे. त्याने त्याच्या अनेक मित्रांना इंडस्ट्रीत सेटल होण्यास, तसेच मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यास मदत केली आहे. सलमान होस्ट करत असलेल्या बिग बॉसमध्ये त्याचा एक जिवलग मित्र विकास भल्लाही सहभागी झाला आहे, मात्र हा शो जिंकण्यात सलमानशी असलेल्या दोस्तीचा फायदा होणार नाही, असे विकासने म्हटले आहे. हा एक निष्पक्ष शो असून सलमानही त्या शोचा निष्पक्ष होस्ट आहे, असे  त्याने सांगितले.
अनेक चित्रपट, टीव्ही शोजमध्ये काम केलेला विकास हा एक गायकही असून सलमान, सोनाक्षी आणि संजय दत्त अभिनित 'पो-पो' गाणे त्यानेच गायले आहे. 
बिग बॉसआधी विकास फिअर फॅक्टर आणि स्टार या रॉकस्टार या शोमध्येही सहभागी झाला होता. 
 

Web Title: Salman's friendship will not help to win the Big Boss - Vikal Bhalla
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.