प्रिया प्रकाश वारिअरचा एक डोळ्यांनी इशारा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. देशभरातील लोकांना हा व्हिडीओ आवडला होता. त्यानंतर प्रियाला मोठी लोकप्रियता मिळाली. इतकेच नाही तर काही सिनेमेही ती करत आहे. ती सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओज शेअर करत असते. या व्हिडीओत प्रिया जबरदस्त अंदाजात डान्स करताना दिसत आहे. ती यात दलेर मेहंदीच्या टबोलो ता रा रा' गाण्यावर ठुमके मारत आहे.

प्रिया प्रकाश वारिअरचा हा व्हिडीओ एका कार्यक्रमातील असल्याचं दिसतंय. ज्यात ती स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. यात प्रिया एकटी नसून तिच्या मैत्रीणीही डान्स करताना दिसत आहे. तर लोक त्यांना चीअर करत आहेत. हे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

प्रिया प्रकाश वारिअरने काही दिवसांपूर्वी तिचं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं असून त्यावर ती कधी गाणं गाताना दिसते तर कधी डान्स करताना. तिचे फोटोही सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत राहतात. इन्स्टाग्रामवरही प्रियाची लोकप्रियता कमी नाही. कमी वेळेतच प्रियाचे इन्स्टावर ७१ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत.

दरम्यान प्रियाचं 'ओरू अदार लव' सिनेमातील काम खूप पसंत केलं गेलं होतं. आता ती लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. प्रिया 'श्रीदेवी बंगलो' आणि 'लव्ह हॅकर्स' या दोन बॉलिवूड सिनेमाच्या माध्यमातून हिंदीत डेब्यू करणार आहे. 
 

Web Title: Priya Prakash Varrier dance in red saree on daler mehndi bolo ta ra ra song video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.