Nikuj ते beyounick... स्वतःची यूनिक ओळख निर्माण करणाऱ्या तरुणाचा थक्क करणारा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 10:29 AM2020-09-04T10:29:53+5:302020-09-04T11:47:23+5:30

Nikunj Lotia नावाच्या तरूणाने सुरू केलेल्या या चॅनलला आज ७ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तर १.२ बिलियनपेक्षा व्ह्यूज त्यांच्या व्हिडीओला आहेत. पण हा प्रवास कसा सुरू झाला?

Nikunj aka BeYouNick Opens Up About His Journey and his unique Content | Nikuj ते beyounick... स्वतःची यूनिक ओळख निर्माण करणाऱ्या तरुणाचा थक्क करणारा प्रवास

Nikuj ते beyounick... स्वतःची यूनिक ओळख निर्माण करणाऱ्या तरुणाचा थक्क करणारा प्रवास

googlenewsNext

सध्या यूट्यूबवर वेगवेगळ्या चॅनल्सचा महापूर आलाय. सगळेच काहीतरी करत असतात. पण अशी काही मोजकीच चॅनल्स आहेत ज्यांचं नाणं कितीही चॅनल्स आले तरी खणखणीत वाजतं. त्यापैकीच एक चॅनल म्हणजे ‘Be YouNick’. डोंबिलवलीच्या एका तरूणाने सुरू केलेलं हे चॅनल आजचं सर्वात झक्कास चॅनल मानलं जातं. यांचे कितीतरी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले असतात. तरूणाईमध्ये तर यांच्या यूनिक स्टाईलची कमालीची क्रेझ बघायला मिळते. 

Nikunj Lotia नावाच्या तरूणाने सुरू केलेल्या या चॅनलला आज ७ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तर १.२ बिलियनपेक्षा व्ह्यूज त्यांच्या व्हिडीओला आहेत. पण हा प्रवास कसा सुरू झाला? एकापेक्षा भन्नाट कंटेटच्या आयडिया कशा सुचतात? याचा खुलासा स्वत: Nikunj Lotia याने केलाय. चला जाणून घेऊन Nikuj ते beyounick...चा थक्क करणारा प्रवास....

१) ‘Be YouNick’ ची सुरूवात नेमकी कशी झाली?

- एका लांबलचक बोरींग स्टोरीला शॉर्ट करून सांगायचं तर मी लोकांनी ऑनलाइन कंटेट करताना पाहत होतो. हे मी तेव्हाचं सांगतोय जेव्हा जिओ आणि 3G काही नव्हतं. इतरांचे व्हिडीओज पाहून मलाही वाटलं की, मी सुद्धा हे करू शकतो. तर मी आणि माझ्या काही मित्रांनी Not So funny नावाचं एक चॅनल सुरू केलं. या चॅनलवर काय वेगळं करत नाही आहोत या विचारापासून मग Be YouNick ची सुरूवात झाली. 

२) कोणत्या व्हिडीओने Be YouNick’ ला फेम मिळवून दिलं?

- आम्ही एक मौका मौका व्हिडीओ केला होता. हा व्हिडीओ फारच व्हायरल झाला होता. ज्यांनी मौका मौका अ‍ॅड तयार केली होती त्यांनीही आमचा व्हिडीओ पाहिला होता. इतकंच नाही तर त्यांना आवडलाही होता. तेव्हा 200k-500k व्ह्यूज मिळणं म्हणजे फार मोठी गोष्टी होती. आम्हाला मिलियन्स व्ह्यूज मिळाले होते. आम्हाला याची जराही कल्पना नव्हती की, हा व्हिडीओ इतका पॉप्युलर होईल. एकसारखेपणा येऊ नये म्हणून आम्ही आणखी काही व्हिडीओज केले. त्यातील काही चालले तर काही नाही चालले. पण काही व्हिडीओ ट्रेन्ड करू लागले होते. त्यातून आमच्या व्ह्यूअर्सपर्यंत पोहोचलं की, हे चॅनल 'यूनिक' कंटेट करतं.

३) वेगवेगळा कंटेंट करण्याच्या कॉन्सेप्ट कुठून मिळतात?

- रोजच्या जगण्यातील परिस्थिती आणि अनुभव. यातून आम्ही कंटेंटची थीम ठरवतो. आमच्या कंटेंटचा मेन फॉरमॅट हा कॉमेडी आहे आणि तो रिअल लाइफवर आधारित आहे. आमचा कंटेंट बघाल तर लक्षात येईल की, हा कंटेंट जास्तीत जास्त रिलेट करणाऱ्या सिच्युएशनवर आहे. त्यात जरा ट्विस्ट असतात.

४) फोर्ब्स इंडियानेही तुमच्या कामाची दखल घेतली आहे. याकडे कसे बघता?

- याचं खरं उत्तर द्यायचं तर मी आम्हाला मिळालेल्या सपोर्टसाठी आणि प्रेमासाठी फारच नम्र आहे. या गोष्टी फारच स्पेशल असतात. पण हे सगळं शक्य झालं ते सर्व व्ह्यूअर्समुळे. जे पॉझिटिव्हली कंटेंटसोबत जुळले.

५) तुम्ही अनेक इंटरनॅशनल, बॉलिवूड कलाकारांसोबतही संयुक्तपणे काम केलं. त्याबद्दल काय सांगशील?

- हा अनुभव मजेदार होता. प्रत्येक क्रिएटर त्यांचा विचार त्यांच्या कंटेंटमधून घेऊन येतात. त्यामुळे जेव्हा आमच्याकडे काही वेगळं करायला नसायचं तेव्हा अशाप्रकारच्या कामाने अनुभव वाढला आणि तो स्क्रीनवर दिसला सुद्धा. राजकुमार रावसोबतच्या कामाने मला शिकवलं की, me what a seasoned Bollywood actor is all about!. तसेच बोमण इराणी सरांबाबत. ते जागेवर जे इम्प्रोवाइज करायचे त्यावर आम्ही पोट धरून हसायचो. तसेच नर्गीस फखरी, सिम्मी सिंह यांच्यासोबतही काम करण्याची मजा आली. यातून लोकांचा कंटेंटबाबतचा विचारही लक्षात आला. प्रत्येकाकडून आम्ही काहीना काही शिकलो आहोत.

६) कोणताही कंटेंट कोणत्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याला अधिक प्रायोरिटी देशील, Instagram, TikTok, YouTube or Facebook?

- खरंतर हे सगळं अवलंबून आहे तुमच्या आयडियावर. काही आयडिया या ठराविक एका प्लॅटफॉर्मसाठीच सुटेबल असतात. जर कंटेंट छोटा आणि हसवणारा असेल तर तो मी इन्स्टाग्रामवर शेअर करेल, जर कंटेंट वेगळा असेल तर तो मी यूट्यूब आणि फेसबुकवर शेअर करेन.

७) इतर यूट्यूबर्सना काय टिप्स देशील?

- काम सुरू ठेवा. तुम्ही आहा तसे रहा. कारण आपण सगळे यूनिक आहोत. तुम्ही तुमचं बेस्ट देण्यावर फोकस करा. निरर्थक टिका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. त्याऐवजी ज्यांचा सपोर्ट मिळतोय आणि ज्यांना तुमचं काम आवडतंय त्यांचे आभार माना. टिका करणारे कुठेही आहेत. त्याकडे पॉझिटिव्हली बघा. निरर्थक टिका करणाऱ्यांवर वेळ घालवण्यापेक्षा तो तुमच्या कामाला बेटर करण्यासाठी वापरा.

Web Title: Nikunj aka BeYouNick Opens Up About His Journey and his unique Content

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.