Mirzapur 2 Pankaj Tripathi acting from neck going viral fans demand award | Mirzapur 2 : पंकज त्रिपाठीने केवळ मान हलवून केलाय धमाका, फॅन्सकडून अवॉर्डची मागणी

Mirzapur 2 : पंकज त्रिपाठीने केवळ मान हलवून केलाय धमाका, फॅन्सकडून अवॉर्डची मागणी

मिर्झापूर २ च्या रिलीजनंतर एकच धमाका झाला आहे. स्टोरीपासून ते कलाकारांच्या अभिनयापर्यंत सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सीरीजमध्ये पंकज त्रिपाठी यांनी साकारलेल्या कालीन भैयाचा स्वॅग तर वेगळ्या लेव्हलवर बघायला मिळाला. त्यांची भूमिका या सीरीजचा जीव झाली आहे. त्यांच्या भूमिकेशिवाय या सीरीजचा विचारही केला जाऊ शकत नाही. आता तर पंकज त्रिपाठी यांना अवॉर्ड देण्याची मागणी केली जात आहे. पण ज्या कारणासाठी त्यांना अवॉर्ड देण्याची मागणी होतीय ते वाचून तुम्ही अवाक् व्हाल.

सोशल मीडियावर मिर्झापूर आणि मिर्झापूर २ चा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत फक्त आणि फक्त कालीन भैया दिसत आहेत. ते एक शब्दही न बोलता आपल्या मानेने अ‍ॅक्टिंग करत आहेत. त्यांनी केवळ मान हलवून धमाका केला आहे. त्यांच्या या अंदाजाने फॅन्स हैराण झाले आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं की पंकज त्रिपाठी इतके कमालीचे कलाकार आहे की, केवळ आपल्या मानेने अभिनय करतात. ज्या यूजरने हा व्हिडीओ शेअर केलाय त्याने लिहिलंय की, पंकज त्रिपाटीच्या मानेलाही बेस्ट अ‍ॅक्टिंगचा अवॉर्ड मिळाला पाहिजे. (कालीन भैयाऐवजी दुसरी कोणती भूमिका करायला आवडली असती? पंकज त्रिपाठी म्हणाला....)

या यूजरने ही मागणी केल्यावर तर सोशल मीडियावर जणू मोहिमच सुरू झाली आहे. अनेकजण पंकज त्रिपाठीला अवॉर्ड देण्याबाबत बोलत आहेत. सर्वांना असं वाटतं की, अभिनेत्याचं हे टॅलेंट त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. एका यूजरने लिहिले की, पंकज त्रिपाठीची अ‍ॅक्टिंग अर्जुन कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा सारख्या अनेक स्टारपेक्षा चांगली आहे. (इंटरनेटवर 'मिर्झापूर २'च्या डायलॉग्सचा धुमाकूळ, व्हायरल झालेत पोट धरून हसायला लावणारे मीम्स)

एका दुसऱ्या यूजरने मजेदार प्रश्न विचारला की, कोणतं पान खाल्लं आहे? बनारसी आहे का?. सोशल मीडियावर असे अनेक ट्विट व्हायरल झाले आहेत. प्रत्येकजण पंकज त्रिपाठीला अवॉर्ड देण्याबाबत बोलत आहे. इतकेच नाही तर पंकज त्रिपाठीने स्वत: यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केवळ दोन शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ठीक आहे, धन्यवाद!
 

Web Title: Mirzapur 2 Pankaj Tripathi acting from neck going viral fans demand award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.