Dawood Ibrahim girlfriend Mehwish Hayat reaction on her allegation | डॉन दाऊद इब्राहिमसोबतच्या अफेअरबाबत अभिनेत्री मेहविश हयातची पहिली प्रतिक्रिया!

डॉन दाऊद इब्राहिमसोबतच्या अफेअरबाबत अभिनेत्री मेहविश हयातची पहिली प्रतिक्रिया!

एका न्यूज चॅनेलने पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयातचे संबंध मोस्ट वॉन्टेड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत असण्याचा खुलासा केला आहे. ही कथित माहीत समोर आल्यानंतर पहिल्यांदाच अभिनेत्री महविश हयातने यावर प्रतिक्रिया दिली. महविशने ट्विटरवरून तिच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांचं उत्तर दिलं आहे.

बुधवारी ट्विटच्या माध्यमातून महविश हयात म्हणाली की, माझ्या विरोधात जे चुकीचे आरोप लावण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देऊन त्याला मला त्याला महत्व द्यायचं नाहीये. मला त्यांना अजेंडा माहीत आहे आणि हेही मला माहीत आहे की, ते असे का करत आहेत. त्यासोबत मी काश्मीरमधील त्यांची दडपशाहीवर आणि बॉलिवूडच्या खोट्या स्वरूपाचे मुद्दे उचलत राहीन. आणि हो...पुढील वेळी जर माझं नाव कुणाशी जोडायचं झालं तर ते नाव-लियोनार्डो डि कॅप्रियो.

एका न्यूज चॅनेलने सोमवारी आपल्या एका शोमधून खुलासा केला होता की, दाऊद सध्या पाकिस्तानी अभिनेत्री महविश महातच्या संपर्कात आहे आणि ही अभिनेत्री आज दाऊदची सर्वात मोठी कमजोरी आहे.

महविश हयातने आपल्या करिअरच्या सुरूवातीला एक आयटम नंबर केला होता. त्यानंतरच ती प्रकाशझोतात आल्याचे बोलले जाते. आता दाऊद इब्राहिमच्या संपर्कात असल्याने आज महविशला मोठमोठे सिनेमे मिळत आहेत. फिल्म इंडस्ट्रीत तिचा वजन वाढलं आहे. सरकारमध्येही तिचं वजन वाढत आहे.

दरम्यान, याची सुरूवात २०१९ मध्ये झाली होती. जेव्हा पाकिस्तानच्या सिनेमात काम करणारी एका अभिनेत्रीला तिथे एका मोठ्या नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ३७ वर्षीय महविश हयातला काही वर्षांआधीपर्यंत कुणी ओळखत नाही. पण आजच्या तारखेला ती पाकिस्तानातील मीडियात लोकप्रिय चेहरा ठरली. 

हेे पण वाचा :

दाऊद इब्राहिमचे वास्तव्य आमच्याच देशात, पाकिस्तानने पहिल्यांदाच दिली कबुली

धक्कादायक! आता अंडरवर्ल्ड जगतात दुसऱ्या डॉनची चर्चा; दाऊद बॅकफूटवर

Web Title: Dawood Ibrahim girlfriend Mehwish Hayat reaction on her allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.