पती-पत्नीच्या भावविश्वावर आधारित ‘आटपाडी नाइट्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:04+5:302016-03-16T08:36:04+5:30

मराठी प्रेक्षकवर्ग चोखंदळ झाला आहे, त्यासाठी दिग्दर्शकसुद्धा अनेक वेगळ्या धाटणीचे विषय प्रेक्षकांसमोर ठेवत आहेत. असाच एक धाडसी प्रयोग व वेगळा विषय घेऊन नव्या धाटणीचे

'Atpadi Nights' based on the Vishvishvashwari | पती-पत्नीच्या भावविश्वावर आधारित ‘आटपाडी नाइट्स’

पती-पत्नीच्या भावविश्वावर आधारित ‘आटपाडी नाइट्स’

googlenewsNext

मराठी प्रेक्षकवर्ग चोखंदळ झाला आहे, त्यासाठी दिग्दर्शकसुद्धा अनेक वेगळ्या धाटणीचे विषय प्रेक्षकांसमोर ठेवत आहेत. असाच एक धाडसी प्रयोग व वेगळा विषय घेऊन नव्या धाटणीचे दिग्दर्शक नितीन विजय सुपेकर यांनी पहिल्यांदाच बेडरूममधील पती-पत्नीच्या भावविश्वावर भाष्य करणारे कथानक आटपाडी नाइट्स या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणले आहे.
सिंधविजय स्टुडिओची प्रथम प्रस्तुती असलेल्या या सिनेमाची निर्मिती नेहा सुपेकर, गजानन शिंदे, अमर परदेशी आणि विनोद राजे यांनी केली आहे. सिनेमाचे संगीत सिद्धार्थ दुकटे, विजय गवंडे यांनी तर पार्श्वसंगीत विजय गवंडे यांचे आहे. गीतलेखन कमलेश कुलकर्णी, नारायण पुरी यांनी केले आहे. तसेच सिनेमाची सिनेमॅटोग्राफी दिवाकर नागराज व वीरधवल पाटील यांनी, तर संकलनाची बाजू नीलेश गावंड यांनी सांभाळली आहे.
कार्यकारी निर्माते म्हणून विनायक पाष्टे यांनी काम पाहिले आहे. असा हा दारामागच्या चटकदार गोष्टी अशी आकर्षक टॅगलाइन असलेला सिनेमा लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: 'Atpadi Nights' based on the Vishvishvashwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.