Arvind Trivedi Death: अरविंद त्रिवेदी यांचे 82 व्या वर्षी निधन, 'रामायण'मध्ये साकारली होती रावणाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 07:53 AM2021-10-06T07:53:59+5:302021-10-06T07:54:45+5:30

'रामायण'मध्ये रावनाची जबरदस्त भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांच्या इतरही काही भूमिका अत्यंत लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी टीव्ही मालिका 'विक्रम आणि वेताळ'मध्येही काम केले होते. ही मालिकाही बऱ्याच दिवस चालली होती.

Actor Arvind Trivedi Ravan of Ramayana no more at age of 82 | Arvind Trivedi Death: अरविंद त्रिवेदी यांचे 82 व्या वर्षी निधन, 'रामायण'मध्ये साकारली होती रावणाची भूमिका

Arvind Trivedi Death: अरविंद त्रिवेदी यांचे 82 व्या वर्षी निधन, 'रामायण'मध्ये साकारली होती रावणाची भूमिका

Next

टीव्ही जगतातील 'रामायण' या लोकप्रिय मालिकेत रावणाची (Ravan) भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी (Arvind Trivedi) यांचे निधन (Passes Away) झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. त्रिवेदी यांनी रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका साकारली होती. (Actor Arvind Trivedi Ravan of Ramayana no more at age of 82)

मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमी येथे अरविंद त्रिवेदी यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, मात्र, काल ​​रात्री हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनीही त्यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे.

'रामायण'मध्ये रावनाची जबरदस्त भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांच्या इतरही काही भूमिका अत्यंत लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी टीव्ही मालिका 'विक्रम आणि वेताळ'मध्येही काम केले होते. ही मालिकाही बरीच गाजली होती.

अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन येथे झाला होता. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगमंचावरून केली होती. त्यांचे भाऊ उपेंद्र त्रिवेदी हेदेखील गुजराती सिनेमांतील एक चर्चित नाव आहे. गुजराती भाषेतील धार्मिक आणि सामाजिक सिनेमांतून अरविंद त्रिवेदी यांना एक विशेष ओळख मिळाली. त्यांना त्यांच्या जबरदस्त अभिनयासाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

मे महिन्यात पसरली होती मृत्यूची अफवा -
अरविंद त्रिवेदी हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. याच वर्षी मे महिन्यात त्यांच्या मृत्यूची अफवाही पसरली होती. तेव्हा कौस्तुभ यांनी पुढे येऊन, अरविंदजी यांची प्रकृती पूर्णपणे बरी असल्याचे सांगितले होते. तसेच, फेक न्यूज पसरवू नये, अशी विनंतीही त्यांनी केली होती.

त्रिवेदी यांनी किमान 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले. 2002 मध्ये त्यांना सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशनचे (सीबीएफसी) कार्यवाह अध्यक्षही बनविण्यात आले होते. याशिवाय, ते 1991 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर खासदारही झाले होते.
 

 

Read in English

Web Title: Actor Arvind Trivedi Ravan of Ramayana no more at age of 82

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app