शाब्बास पोरांनो! जुळे भाऊ एकत्र शिकले, एकत्र परीक्षा दिली अन् JEE मध्ये मिळवले सारखेच गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 20:12 IST2026-02-17T20:10:28+5:302026-02-17T20:12:19+5:30

दोघांनी JEE-Main मध्ये 300 पैकी 285 गुण मिळवत परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली.

JEE-Main Exam Result Success story of twin brothers; studied together, gave exams together and scored the same marks in JEE-Main | शाब्बास पोरांनो! जुळे भाऊ एकत्र शिकले, एकत्र परीक्षा दिली अन् JEE मध्ये मिळवले सारखेच गुण

शाब्बास पोरांनो! जुळे भाऊ एकत्र शिकले, एकत्र परीक्षा दिली अन् JEE मध्ये मिळवले सारखेच गुण

JEE-Main Exam Result: राजस्थानचेकोटा शहर पुन्हा एकदा एका प्रेरणादायी कथेची साक्षीदार ठरली आहे. यावेळी ही कहाणी जुळ्या भाऊ महरूफ अहमद खान आणि मसरूर अहमद खान यांची आहे. एकत्र शिक्षण, एकत्रच कोट्यात कोचिंग घेतलेल्या जुळ्या भावांनी सारख्याच गुणांसह देशातील कठीण अशी JEE-Main परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

एकाच शिफ्टमध्ये पेपर दिला, सारखेच गुण मिळाले...

ओडिशातील भुवनेश्वर येथून आयआयटीचे स्वप्न घेऊन कोट्यात आलेल्या या जुळ्या भावांनी JEE-Main मध्ये 300 पैकी 285 गुण मिळवत परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे, दोघांनी एकाच केंद्रावर आणि एकाच शिफ्टमध्ये परीक्षा दिली होती. 

मुलांच्या स्वप्नासाठी आईचा त्याग...

या यशामागे सर्वात मोठा आधार ठरल्या त्या दोघांची आई डॉ. जीनत बेगम. त्या ओडिशामध्ये शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. मात्र, मुलांनी इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, त्यांनी मुलांच्या शिक्षणाला प्राधान्य देत आपली सरकारी नोकरी सोडली. गेल्या तीन वर्षांपासून डॉ. जीनत बेगम कोट्यात राहून दोन्ही मुलांची दिनचर्या, अभ्यास आणि आरोग्याची पूर्ण काळजी घेत आहेत. त्यांच्या त्यागामुळेच आज मुलांनी चमकदार कामगिरी केली आहे.

आपापसातील स्पर्धा ठरली ताकद

7 मे 2008 रोजी जन्मलेल्या महरूफ आणि मसरूर यांनी शालेय शिक्षणही एकाच शाळेत पूर्ण केले. पुढे IIT-JEE Advanced क्रॅक करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते कोट्यात आले आणि Allen Career Institute मध्ये प्रवेश घेतला. येथेही दोघे एकाच वर्गात, एकत्र बसून अभ्यास करत होते. अभ्यासाची रणनीती, टाइमटेबल, टेस्टची तयारी...सगळे जवळपास समान. मात्र, त्यांची खरी ताकद ठरली ती एकमेकांशी असलेली स्पर्धा. एका टेस्टमध्ये जर एखाद्याचे गुण कमी आले, तर दुसरा त्याला प्रेरणा देत असे आणि चुका समजावून पुढील टेस्टसाठी तयारी मजबूत करून घेत असे.

30 पेक्षा अधिक सुवर्णपदके

विशेष म्हणजे, दोघेही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार आहेत. महरूफने 10वीत 95.2%, तर मसरूरने 97.2% गुण मिळवले आहेत. याशिवाय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाड्समध्ये दोघांनी मिळून 30 पेक्षा अधिक सुवर्णपदके पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. दोघांनी IIT मुंबईच्या Computer Science शाखेतून B.Tech करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Web Title : जुड़वां भाइयों ने JEE Main में समान अंक प्राप्त कर प्रेरणा दी।

Web Summary : ओडिशा के जुड़वां भाइयों, जिन्होंने कोटा, राजस्थान में पढ़ाई की, ने जेईई-मेन में समान 285 अंक प्राप्त किए। उनकी माँ, एक स्त्री रोग विशेषज्ञ, ने उनके सपनों का समर्थन करने के लिए अपनी नौकरी छोड़ दी। वे आईआईटी बॉम्बे में कंप्यूटर साइंस की पढ़ाई करना चाहते हैं।

Web Title : Twin brothers crack JEE Main with identical scores, inspire all.

Web Summary : Twin brothers from Odisha, studying in Kota, Rajasthan, scored identical 285 marks in JEE-Main. Their mother, a gynecologist, quit her job to support their dreams. They aim to study Computer Science at IIT Bombay, showcasing hard work and mutual support.