Farsewale Baba : मथुरेत तणाव! अफवांमुळे जमाव हिंसक; 'फरसावाले बाबां'नंतर ड्रायव्हरचा मृत्यू; १३ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 11:04 IST2026-03-22T11:03:53+5:302026-03-22T11:04:41+5:30

Farsewale Baba : मथुरेत झालेल्या एका भीषण अपघातात गोरक्षक 'फरसावाले बाबा' यांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या ट्रक चालकाचाही आता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

mathura accident rumours violence Farsewale Baba death 13 arrested | Farsewale Baba : मथुरेत तणाव! अफवांमुळे जमाव हिंसक; 'फरसावाले बाबां'नंतर ड्रायव्हरचा मृत्यू; १३ जणांना अटक

Farsewale Baba : मथुरेत तणाव! अफवांमुळे जमाव हिंसक; 'फरसावाले बाबां'नंतर ड्रायव्हरचा मृत्यू; १३ जणांना अटक

मथुरेत झालेल्या एका भीषण अपघातात गोरक्षक 'फरसावाले बाबा' यांचा मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्या ट्रक चालकाचाही आता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोसीकला पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे दोन ट्रकची धडक झाली, ज्यामध्ये गोरक्षक चंद्रशेखर ऊर्फ फरसेवाले बाबा यांचा जागीच मृत्यू झाला. 

अपघातानंतर पसरलेल्या अफवांनी परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले असून अफवा पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं की, हा एक अपघात होता जो केवळ धुक्यामुळे झाला. परंतु घटनेनंतर काही लोकांनी याला 'गोतस्करी'शी जोडून अफवा पसरवण्यास सुरुवात केली. पाहता पाहता या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केलं आणि परिसरात तणाव निर्माण झाला.

रस्ता रोको आणि दगडफेक

अफवांना बळी पडत काही लोकांनी नॅशनल हायवे रोखून धरला आणि पोलिसांवर दगडफेकही केली. परिस्थिती बिघडत असल्याचं पाहून पोलिसांनी कठोर पावलं उचलली. याप्रकरणी छाता पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे इतर लोकांची ओळख पटवली जात असून लवकरच आणखी अटक होण्याची शक्यता आहे.

दक्ष चौधरी आणि तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मथुरेबाहेरचा रहिवासी असलेला दक्ष चौधरी आपल्या तीन साथीदारांसह फरसावाले बाबांच्या आश्रमात पोहोचला होता आणि तिथे अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत दक्ष चौधरी आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

ट्रक चालकाचाही अपघातात मृत्यू

मथुरेचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) श्लोक कुमार यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. "फरसावाले बाबांच्या साथीदाराच्या तक्रारीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जात आहे. ट्रक चालकाचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पसरवल्या जाणाऱ्या सर्व अफवा पूर्णपणे निराधार आहेत."

Web Title : मथुरा में तनाव: दुर्घटना के बाद अफवाहों से हिंसा; 13 गिरफ्तार

Web Summary : मथुरा में एक दुर्घटना में एक हिंदू नेता और एक ट्रक ड्राइवर की मौत के बाद, गलत काम की अफवाहों ने हिंसा भड़का दी। पुलिस ने झूठी जानकारी फैलाने और अशांति भड़काने के आरोप में 13 लोगों को गिरफ्तार किया। स्थिति नियंत्रण में है, अधिकारियों का कहना है।

Web Title : Mathura Tense: Rumors Spark Violence After Accident; 13 Arrested

Web Summary : Following an accident that killed a Hindu leader and a truck driver in Mathura, rumors of foul play ignited violence. Police arrested 13 people for spreading false information and instigating unrest. The situation is under control, authorities say.