पोल्ट्री फॉर्ममध्ये सुरू होता बंदुकीचा कारखाना, अनेक रायफल आणि जिवंत काडतूस जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 16:37 IST2021-09-06T16:32:28+5:302021-09-06T16:37:15+5:30
Indian made gun: सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी छापेमारी केली आणि एका व्यक्तीसह मुद्देमाल जप्त केला.

पोल्ट्री फॉर्ममध्ये सुरू होता बंदुकीचा कारखाना, अनेक रायफल आणि जिवंत काडतूस जप्त
पाटणा: बिहारच्या वैशाली जिल्ह्यात पोलिसांनी रविवारी कोंबड्यांच्या फार्ममध्ये सुरू असलेल्या बंदुकीच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. छाप्यादरम्यान, पोलिसांनी शस्त्रांसह 27 जिवंत काडतुसे जप्त केली. तसेच, घटनास्थळावरून एका व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.
https://t.co/gvTCaIkJlI
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021
शिमलातील जेओरीमध्ये ही दरड कोसळल्याची घटना घडली आहे.#landslide#HimachalPradesh
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण भगवानपूर पोलीस स्टेशन परिसरातील बहलोलपूर गावाचे आहे. या गावात कोंबड्यांच्या फार्ममध्ये मिनी गन कारखाना चालवला जात होता. पोलिसांनां बहलोलपूर गावात एका कोंबड्यांच्या फार्ममध्ये देशी बनावटीच्या बंदुका बनवल्या जात असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी छापा टाकला.
https://t.co/FFf7Vcy7mu
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2021
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना थेट इशारा.#GopichandPadalkar#vijayvadettiwar
पोलिसांना पाहून कोंबड्याच्या फार्ममध्ये बंदुका तयार करणाऱ्या आरोपींनी तेथून पळ काढला. यादरम्यान, पोलिसांनी शस्त्र तस्कर अरविंद उर्फ गुल्टेनला अटक केली. तसेच, घटनास्थळावरुन अनेक मोठ्या रायफल, 27 जिवंत काडतुसे आणि पिस्तूल जप्त केले. या देशी बंदुकांचा वापर आगामा पंचायत निवडणुकीत करणार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच, यापूर्वी अनेक कुख्यात गुंडांनी या फॅक्ट्रीमधून बंदुका नेल्याची माहिती समोर आली आहे.