धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:33 IST2025-06-12T14:32:42+5:302025-06-12T14:33:00+5:30
विजय उर्फ गप्पू आणि कुंती यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याच दरम्यान, कुंतीचे जब्बार नावाच्या एका तरुणासोबतही नवीन प्रेमसंबंध जुळले.

धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
उत्तर प्रदेशातीललखनऊमध्ये एक हादरवणारी घटना समोर आली आहे. रहिमाबाद येथील अहिंदर गावात २५ वर्षीय विजय उर्फ गप्पू याची त्याच्याच शेजारी राहणाऱ्या प्रेयसीने, तिच्या पती आणि नवीन प्रियकराच्या मदतीने निर्घृण हत्या केली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेले अनैतिक संबंध आणि नंतर त्यात तिसऱ्या व्यक्तीच्या एंट्रीमुळे घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय उर्फ गप्पू आणि कुंती यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. याच दरम्यान, कुंतीचे जब्बार नावाच्या एका तरुणासोबतही नवीन प्रेमसंबंध जुळले. कुंतीचा पती रामभज याला पत्नीच्या विजयसोबतच्या संबंधांची माहिती मिळाल्यानंतर, तिने चक्क पतीलाच विश्वासात घेतले आणि विजयला संपवण्याचा कट रचला. यात तिचा नवीन प्रियकर जब्बारही सामील झाला.
'अशी' घडली क्रूर हत्या
पोलिसांच्या तपासानुसार, शनिवारी रात्री कुंतीने विजयला तिच्या घरी बोलावले. तिथे तिने त्याला भरपूर दारू पाजली. विजय पूर्णपणे मद्यधुंद झाल्यानंतर कुंतीचा पती रामभज आणि प्रियकर जब्बार तिथे आले. या तिघांनी मिळून विजयचा ओढणीने गळा आवळला. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला. हत्येनंतर, जब्बार आणि रामभज यांनी विजयचा मृतदेह ओढत नेऊन गावातील एका घराबाहेर फेकून दिला.
पोलिसांनी सोडवली गुंतागुंत
बुधवारी रहिमाबाद पोलिसांनी या गुंतागुंतीच्या खून प्रकरणाची यशस्वीपणे उकल केली. पुरावे आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुंती, तिचा पती रामभज आणि तिचा नवीन प्रियकर जब्बार यांना अटक केली.
निरीक्षक आनंद द्विवेदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंतीचे विजय उर्फ गप्पूसोबत अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुंतीचा पती रामभजला हे कळल्यानंतर त्याने याला विरोध केला. याच काळात कुंतीची जब्बारसोबत जवळीक वाढली आणि जब्बार रामभजच्या घरी येऊ लागला. विजयला ही बाब खटकली. यानंतरच कुंतीने पती रामभज आणि प्रियकर जब्बारसोबत मिळून विजयला संपवण्याचा कट रचला.
त्रिकोणी प्रेमातून झालेल्या या निर्घृण हत्येने समाजमन सुन्न झाले आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना तुरुंगात पाठवले असून, पुढील तपास सुरू आहे.