Crypto Currency: क्रिप्टो करंसी गुंतवणूकीत धोका, बड्या व्यापाऱ्यास 73 लाख रुपयांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 17:51 IST2022-03-12T17:37:24+5:302022-03-12T17:51:55+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कविडगुडा येथील रहिवाशी असलेल्या व्यापाऱ्याल टेलिग्राम ग्रुपवरुन एक मेसेज आला होता.

Crypto Currency: क्रिप्टो करंसी गुंतवणूकीत धोका, बड्या व्यापाऱ्यास 73 लाख रुपयांचा गंडा
हैदराबाद - क्रिप्टो करन्सीच्या नावाने एका व्यक्तीची तब्बल 73 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सायबर आरोपीने हैदराबादमधील बड्या व्यापाऱ्याला गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कविडगुडा येथील रहिवाशी असलेल्या व्यापाऱ्याल टेलिग्राम ग्रुपवरुन एक मेसेज आला होता. त्यावेळी, सबंधित युजर्सने त्यास ग्रुप जॉईन करण्याचे सूचवले. त्यानुसार, व्यापाऱ्याने ग्रुप जॉईन केल्यानंतर त्यास क्रिप्टो करंन्सीमध्ये फायदेशीर गुंतवणुकीसंदर्भात मेसेज आले. त्यावेळी, आरोपीकडे संबंधित व्यापाऱ्याने फोनद्वारे विचारणा केली. त्यावेळी, व्यापाऱ्याला गुगल फॉर्मची लिंक पाठवून तो फॉर्म भरण्यास सांगण्यात आले.
व्यापाऱ्याने संबंधित फॉर्म भरुन त्या लिंकवरुन अकाऊंट बनवले. त्यानंतर, 20 दिवसांत तब्बल 73 लाख रुपये संबंधित बँक खात्यात ट्रान्सफरही केले. दरम्यान, आरोपीने व्यापाऱ्याला आणखी लालच दाखवले, तुमची 30 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून आणखी रक्कम गुंतवणूक करण्याचे सूचवले. मात्र, आपल्याकडी सर्वच पैशांची गुंतवणूक केल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे व्यापाऱ्याच्या लक्षात आले. त्यामुळे, व्यापाऱ्याने पोलिसात धाव घेतली. आरोपीविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.