CoronaNews : 'त्या' कॉल गर्लची कोरोना चाचणी 'पॉझिटिव्ह'; टांगणीला लागला अनेकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 17:23 IST2020-07-04T17:21:05+5:302020-07-04T17:23:23+5:30

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

CoronaNews : Call girl get corona positive in Jaipur  | CoronaNews : 'त्या' कॉल गर्लची कोरोना चाचणी 'पॉझिटिव्ह'; टांगणीला लागला अनेकांचा जीव

CoronaNews : 'त्या' कॉल गर्लची कोरोना चाचणी 'पॉझिटिव्ह'; टांगणीला लागला अनेकांचा जीव

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात आता अनेकांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. उदयपूर जिल्ह्यातील एका कॉल गर्लचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिच्या संपर्कात अनेक तरूण आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे आता कॉल गर्लच्या कोरोना रिपोर्टमुळे अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. 

या कॉल गर्लसह सात युवती आणि दहा अन्य युवकांना अटक करण्यात आले होते. उदयपूर येथे दोन-तीन वेगवेगळ्या छाप्यांमध्ये त्यांना अटक करण्यात आले होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यात एकीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला. उदयपूर पोलिसांनी ही कारवाई करताना तीन ठिकाणांवर छापे टाकले. खबरीनं दिलेल्या माहितीनुसार तीन महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी धाड टाकली. त्यांनी वेशांतर करून हा छापा टाकला. या विविध छाप्यांत 17 जणांना अटक करण्यात आली. 

DSP चेतना भाटी यांनी येथील हॉटेल टर्बोवर धाड टाकून चार युवतींना अटक केली. त्यांच्यावर वेश्या व्यावसाय करण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या धाडीत मद्याचा मोठा साठाही जप्त करण्यात आला. यापैकी एकीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळल्यानं पोलिसांचं काम आणखी वाढलं आहे. या कॉल गर्लनं दरम्यानच्या काळात अनेक युवकांशी संबंध ठेवल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे त्या युवकांचा शोध घेण्याचं काम पोलिसांना करावं लागणार आहे.
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

महेंद्रसिंग धोनी-साक्षीच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण; पाहा त्यांच्या लग्नातील Unseen Photo!

सचिन तेंडुलकरनं टेनिस स्टार रॉजर फेडररकडे मागितला सल्ला; पाहा Video 

दिग्गजांशी तुलना करण्याची तुझी लायकी नाही; पाकिस्तानच्या कर्णधाराला घरचा आहेर

Photo : महेंद्रसिंग धोनीच्या फार्म हाऊसचा थाटच न्यारा; 7 एकर परिसरात बांधलाय स्वप्नांचा बंगला!

पाकिस्तान क्रिकेट संघाला भीकेचे डोहाळे; इंग्लंड दौऱ्यावर स्पॉन्सर्स मिळेना!

भारतातील TikTok बंदीवर ऑस्ट्रेलियन डेव्हिड वॉर्नर म्हणतो...

ENGvsWI : पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; बुधवारपासून रंगणार लढत

Web Title: CoronaNews : Call girl get corona positive in Jaipur