ENGvsWI : पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; बुधवारपासून रंगणार लढत

बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 03:44 PM2020-07-04T15:44:39+5:302020-07-04T15:45:32+5:30

whatsapp join usJoin us
Breaking : England name squad for first Test against West Indies | ENGvsWI : पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; बुधवारपासून रंगणार लढत

ENGvsWI : पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; बुधवारपासून रंगणार लढत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेस्ट इंडिजविरुद्ध 8 जुलैपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड क्रिकेट मंडळानं शनिवारी 13 सदस्यीय संघ जाहीर केला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. जो रुट याला दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी या कसोटीत खेळता येणार नाही. त्यामुळे स्टोक्सकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. संघासह 9 राखीव सदस्यांची घोषणाही करण्यात आली.


इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स ( कर्णधार), जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर ( यष्टिरक्षक), झॅक क्रॅवली, जो डेन्ली, ऑली पोप, डॉम सिब्ली, ख्रिस वोक्स, मार्क वूड
राखीव खेळाडू - जेम्स ब्रेसीय, सॅम कुरन, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, सकीब महमूद, क्रेग ओव्हर्टन, ऑली रॉबीन्सन, ऑली स्टोन. 


वेळापत्रक 
8 ते 12 जुलै - साउहॅम्प्टन
16 ते 20 जुलै- मँचेस्टर
24 ते 28 जुलै- मँचेस्टर 

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

महेंद्रसिंग धोनी-साक्षीच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण; पाहा त्यांच्या लग्नातील Unseen Photo!

सचिन तेंडुलकरनं टेनिस स्टार रॉजर फेडररकडे मागितला सल्ला; पाहा Video 

दिग्गजांशी तुलना करण्याची तुझी लायकी नाही; पाकिस्तानच्या कर्णधाराला घरचा आहेर

Photo : महेंद्रसिंग धोनीच्या फार्म हाऊसचा थाटच न्यारा; 7 एकर परिसरात बांधलाय स्वप्नांचा बंगला!

पाकिस्तान क्रिकेट संघाला भीकेचे डोहाळे; इंग्लंड दौऱ्यावर स्पॉन्सर्स मिळेना!

भारतातील TikTok बंदीवर ऑस्ट्रेलियन डेव्हिड वॉर्नर म्हणतो...

Web Title: Breaking : England name squad for first Test against West Indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.