कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना

स्मृतीला मिळाला नवा संघ, आता ती रत्नागिरी जेट्सकडून उतरणार मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:44 IST2025-04-17T18:43:13+5:302025-04-17T18:44:47+5:30

whatsapp join usJoin us
WMPL Ratnagiri Jets Announces Entry Into Womens Maharashtra Premier League Smriti Mandhana Signed As Icon Player And Captain | कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना

कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Womens Maharashtra Premier League Smriti Mandhana Icon Player And Captain Of Ratnagiri Jets  महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेतील (MPL) पुरुष गटात दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets) फ्रँयायझी संघानं  महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL) मध्येही एक संघ खरेदी केला आहे. महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा करताना या फ्रँचायझी संघाने पुढील तीन हंगामांसाठी टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना हिला आयकॉन खेळाडू म्हणून निवडले आहे.  कोकणची राणी होऊन या संघाचे नेतृत्व करत स्मृती मानधना आता क्रिकेटच्या मैदानातील नव्या प्रवासाला निघाली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जेट्सनं केली तगडी संघ बांधणी


स्मृती मानधना ही आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखली जाते. २०२३-२४ च्या   हंगामातील सर्वोत्तम कामगिरीसाठी बीसीसीआयने  वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटर म्हणून तिला सन्मानित केल्याचे पाहायला मिळाले.  स्मृती मानधनाला आपल्या संघात घेत रत्नागिरी जेट्स फ्रँचायझी संघाने WMPL च्या पहिल्या हंगामासाठी मजबूत संघ बांधणी केलीये. जेटसिंथेसिस, रॉयल गोल्डफिल्ड क्लब रिसॉर्ट, फ्लीटगार्ड फिल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि क्रांती वाइन्स प्रायव्हेट लिमिटेड WMPL मध्ये रत्नागिरी जेट्सचे सह-मालक आहेत.

स्मृती मानधनाचा 'चौकार'; भारतीय महिला क्रिकेटमध्ये कुणाला जमलं नाही ते तिनं करुन दाखवलं

मैदानात सामने जिंकण्यासह मनही जिंकू

नव्या फ्रँचायझी संघात सामील झाल्यावर स्मृती मानधना म्हणाली की, रत्नागिरी जेट्स फॅमिलीत आयकॉन खेळाडू म्हणून सामील झाल्याचा आनंद आहे. या फ्रँचायझीने MPL मध्ये यश मिळवले आहे. आता महिला क्रिकेटबद्दल त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. आम्ही साऱ्याजणी मिळून मैदानात सामने जिंकण्यासह क्रिकेट चाहत्यांची मन जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरण्यास उत्सुक आहोत. 

महिला महाराष्ट्र प्रीमियर लीगसाठी असा आहे रत्नागिरी जेट्सचा संघ


  • बॅटर्स - स्मृती मानधना (कर्णधार), गौतमी नाईक, ज्ञानदा निकम,  अनुश्री स्वामी साक्षी कानडी
  • ऑलराउंडर- रसिका शिंदे, चारमी गवई, भक्ती मिरजकर, प्रियांका घोडके, श्रृती महाबलेश्वपकर, प्रेमिला सावंत, तेजश्री ननावरे,  निधी शांभवणी, 
  • विकेट किपर - शिवाली शिंदे, तेजस्वीनी बटवाल
  • बॉलर्स- ज्ञानेश्वरी पाटील,  संजना वाघमोडे, ग्रीषा कटारिया, भूमी फलके, श्रृती भोइर, समिधा चौगुले, जान्हवी बोकडे, नंदिनी सोनावणे, प्रिया कोकरे

Web Title: WMPL Ratnagiri Jets Announces Entry Into Womens Maharashtra Premier League Smriti Mandhana Signed As Icon Player And Captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.