Video : Rohit Sharmaची सरावातही फटकेबाजी; चेंडू असा टोलावला की थेट चालत्या बसच्या छतावर जाऊन पडला 

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) 13व्या पर्वाची सुरुवात व्हायला अवघे काही दिवसच उरले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 08:49 PM2020-09-09T20:49:10+5:302020-09-09T20:50:42+5:30

whatsapp join usJoin us
Watch Video : Rohit Sharma's stunning 95-metre six lands on rooftop of moving bus in Abu Dhabi | Video : Rohit Sharmaची सरावातही फटकेबाजी; चेंडू असा टोलावला की थेट चालत्या बसच्या छतावर जाऊन पडला 

Video : Rohit Sharmaची सरावातही फटकेबाजी; चेंडू असा टोलावला की थेट चालत्या बसच्या छतावर जाऊन पडला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स सलामीच्या सामन्यात भिडणारआयपीएलचे पाचवे जेतेपद पटकावण्यासाठी मुंबई इंडियन्स सज्ज

गतविजेता मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि गत उपविजेता चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. इतर पर्वाप्रमाणे यंदाही मुंबई इंडियन्स ( MI) जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma)ची सरावातील फटकेबाजी पाहून MI जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे, यावर तुमचाही विश्वास बसेल. रोहितनं टोलावलेला उत्तुंग षटकार चक्क मैदानाबाहेरून जाणाऱ्या बसच्या छतावर पडला. 

युवराज सिंग निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या तयारीत, जाणून घ्या कोणत्या संघाकडून ट्वेंटी-20 खेळणार

दुबईत दाखल झाल्यानंतर 6 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) सरावाला सुरुवात केली. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या ( Hardik Pandya), कृणाल पांड्या यांनी सरावात दमदार खेळ दाखवला. हिटमॅन रोहितनंही चौकार-षटकाराची आतषबाजी केली. मुंबई इंडियन्सनं त्यांच्या खेळाडूंच्या सराव सत्राचे अऩेक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात बुधवारी त्यांनी पोस्ट केलेला रोहितचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधणारा ठरला. 

IPL 2020त कोण दाखवणार दम?; 8 संघांच्या खेळाडूंची संपूर्ण लिस्ट एका क्लिकवर!

RCBसाठी 'देवदत्त' धावून येणार; IPL 2020त विराट कोहलीचा हुकमी एक्का सर्वांची बोलती बंद करणार! 

सुरेश रैनाचे दोन मोठे विक्रम IPL 2020मध्ये रोहित शर्मा अन् विराट कोहली मोडणार!

पाहा व्हिडीओ...

मुंबई इंडियन्स Mumbai Indians Players List (MI)  - रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या,  इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल चहर, अनमोलप्रीत सिंग, जयंत यादव, अदित्य तरे, अनुकूल रॉय, क्विंटन डी कॉक, किरॉन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मॅक्लेघन, शेफ्राने रुथरफोर्ड, धवल कुलकर्णी, कोल्टर नील, ख्रिस लीन, सौरभ तिवारी, दिगिजय देशमुख, बलवंत राय, मोहसीन खान.

बुमराहने सहा वेगवेगळ्या स्टाईलने टाकले चेंडू
मुंबई इंडियन्सचा सराव सुरू असताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने चक्क सहा चेंडू वेगवेगळ्या गोलंदाजांच्या स्टाईलमध्ये टाकले. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने आपल्या टिष्ट्वटरवर पोस्ट केला . मुंबई इंडियन्स संघ सरावात मग्न आहे. सराव सुरू असताना बुमराने एक भन्नाट षटक टाकले. या षटकामधील सहाच्या सहा चेंडू वेगवेगळ्या स्टाईलमध्ये टाकले आहेत. मुंबई इंडियन्सने आपल्या टिष्ट्वटर हँडलवर बुमराहचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमधील सहा गोलंदाजांना तुम्ही ओळखता का, असा सवालही मुंबई इंडियन्सने चाहत्यांना केला आहे.


मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या लसिथ मलिंगानं घेतली माघार
संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगा यंदाची आयपीएल खेळणार नाही. मलिंगानं आयपीएलमध्ये 122 सामन्यांत 170 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स त्याच्याच नावावर आहे. त्यानं 19.80च्या सरासरीनं आणि 7.14च्या इकोनॉमीनं ही कामगिरी केली आहे. 2019चे जेतेपद जिंकून देण्यात मलिंगानं महत्त्वाचा वाटा उचलला होता. मुंबई इंडियन्सन त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज जेम्स पॅटीन्सन याची निवड केली आहे. 

 

Web Title: Watch Video : Rohit Sharma's stunning 95-metre six lands on rooftop of moving bus in Abu Dhabi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.