RCBसाठी 'देवदत्त' धावून येणार; IPL 2020त विराट कोहलीचा हुकमी एक्का सर्वांची बोलती बंद करणार!

IPL 2020 : RCBसाठी सलामीचा सक्षम पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 02:39 PM2020-09-09T14:39:27+5:302020-09-09T14:50:18+5:30

whatsapp join usJoin us
Will Royal Challangers Bangalore give chance to Devdutt Padikkal? He is best option for opening in IPL 2020 | RCBसाठी 'देवदत्त' धावून येणार; IPL 2020त विराट कोहलीचा हुकमी एक्का सर्वांची बोलती बंद करणार!

RCBसाठी 'देवदत्त' धावून येणार; IPL 2020त विराट कोहलीचा हुकमी एक्का सर्वांची बोलती बंद करणार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देफलंदाजांची फौज असूनही RCBला एकदाही जेतेपद पटकावता आलेलं नाहीविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली RCBनं तीनदा अंतिम फेरीत प्रवेश केला

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वासाठी सर्वच संघांनी रणनीती तयार केली आहे. 2008पासून एकही जेतेपद न जिंकलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challangers Bangalore) संघाकडून यंदाही अपेक्षा असणार आहेत. विराट, एबी डिव्हिलियर्स आदी मोठी आणि ट्वेंटी-20 स्पेशालिस्ट खेळाडू संघाकडे आहे, परंतु संघाला गरज असते तेव्हा त्यांच्याकडून साजेशी कामगिरी झालेली नाही, हा इतिहास आहे. त्यामुळे कर्णधार विराट चिंतेत आहे. पण, IPL 2020मध्ये त्याची ही चिंता मिटली आहे. त्याच्या संघातील एक खेळाडू सध्या स्थानिक क्रिकेटमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे आणि तो RCBसाठी सक्षम सलामीचा पर्याय ठरू शकतो. 

फ्रँचायझींची क्रिएटीव्हिटी; प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करण्याची संधी इथेही दवडली नाही, Video

RCBनं IPL 2020च्या मोसमासाठी एबी डिव्हिलिअर्स, देवदत्त पडीक्कल, गुरुकीरत सिंह, मोइन अली, मुहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली, वॉशिंग्टन सुंदर आणि युजवेंद्र चहल यांना संघात कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. संघात अजूनही सलामीसाठी सक्षम पर्याय विराटकडे नाही.  पण, संघानं कायम ठेवलेल्या खेळाडूंमधील एक फलंदाजाची सध्या चर्चा आहे. या 19 वर्षीय खेळाडूनं विजय हजारे चषक आणि सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत त्यानं सर्वाधिक धावांचा पाऊस पाडला आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये पदार्पण करताना त्यानं सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर केला. 

विराट कोहलीच्या RCBचा पहिलाच मुकाबला सनरायझर्स हैदराबादशी; पाहा त्यानंतर कोणाकोणाला टक्कर देणार 

देवदत्त पडीक्कल ( Devdutt Padikkal) असं या खेळाडूचे नाव आहे. कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देवदत्तनं 2019मध्ये विजय हजारे चषक स्पर्धेत 11 सामन्यांत 81.1 च्या स्ट्राईट रेटनं 609 धावा केल्या. त्यात दोन शतकांचा समावेश असून नाबाद 103 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेत 11 सामन्यांत 177.7च्या स्ट्राईक रेटनं 517 धावा चोपल्या. त्यात नाबाद 122 ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. यात पाच अर्धशतकांसह एका शतकाचा समावेश आहे. 

रोहित शर्मा अऩ् महेंद्रसिंग धोनी यांच्यात सलामीला टक्कर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ ( Royal Challangers Bangalore Team) 
एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पड्डीकल, गुरकीरत सिंग, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, विराट कोहली. वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, क्रिस मॉरिस, अॅरोन फिंच, केन रिचर्डसन, डेल स्टेन, उदाना, अहमद, फिलिप, देशपांडे.


 

संपूर्ण वेळापत्रक (Royal challengers bangalore Time Table, IPL 2020)
21 सप्टेंबर, सोमवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
24 सप्टेंबर, गुरुवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
28 सप्टेंबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
3 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी
5 ऑक्टोबर, सोमवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
10 ऑक्टोबर, शनिवार - चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
12 ऑक्टोबर, सोमवार - ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
15 ऑक्टोबर, गुरुवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
17 ऑक्टोबर, शनिवार - राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
21 ऑक्टोबर, बुधवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी


25 ऑक्टोबर, रविवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
28 ऑक्टोबर, बुधवार - मुंबई इंडियन्स विरुद्ध ऱॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी
31 ऑक्टोबर, शनिवार - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्घ सनरायझर्स हैदराबाद, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
2 नोव्हेंबर, सोमवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी

सुरेश रैनाचे दोन मोठे विक्रम IPL 2020मध्ये रोहित शर्मा अन् विराट कोहली मोडणार!

Web Title: Will Royal Challangers Bangalore give chance to Devdutt Padikkal? He is best option for opening in IPL 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.