Rahul Dravid has done a great job at NCA as he looks after the 2nd string players, says Sourav Ganguly | 'दादा'कडून राहुल द्रविडचं भरभरून कौतुक; 'दी वॉल'ला दिलं टीम इंडियाच्या यशाचं श्रेय, जाणून घ्या का

'दादा'कडून राहुल द्रविडचं भरभरून कौतुक; 'दी वॉल'ला दिलं टीम इंडियाच्या यशाचं श्रेय, जाणून घ्या का

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यानी माजी सहकारी व टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू राहुल द्रविड ( Rahul Dravid) याचे भरभरून कौतुक केलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाच्या यशात राहुल द्रविडचा मोठा वाटा आहे, असं मत व्यक्त करताना 'दादा'नं त्याचे आभार मानले. Jasprit Bumrah Wedding : झाला खुलासा!, जसप्रित बुमराह कधी व कुणासोबत करणार लग्न? 

राहुल द्रविड सध्या BCCIच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) हे दुसऱ्या फळीतील खेळाडू तयार झाले. सिराज व शार्दूल यांचे कौतुक करताना गांगुलीनं भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं उदाहरण दिलं. तो म्हणाला,''इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह या गोलंदाजांच्या गैरहजेरीत सिराज व शार्दूल यांनी जबाबदारीनं खेळ केला. त्यांनी ब्रिस्बेन कसोटीत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आणि भारतानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली. राहुल द्रविडनं NCAमध्ये चांगलं काम केलं आहे. तो दुसऱ्या फळीतील खेळाडूंवर अधिक लक्ष देतो.'' शाहिद आफ्रिदी अन् जावई शाहिन आफ्रिदी यांचा 'दुल्हे राजा'वाला व्हिडीओ व्हायरल, लोकं घेतायेत मजा!  

राहुल द्रविड जवळपास पाच वर्ष युवा खेळाडूंसोबत काम करत आहे. तो १९ वर्षांखालील भारतीय संघाचा प्रशिक्षक होता आणि २०१८मध्ये त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं वर्ल्ड कप जिंकला होता, तर २०१६ मध्ये भारताला अंतिम फेरीत हार मानावी लागली होती. त्यानंतर राहुल द्रविडकडे NCA ची जबाबदारी सोपवण्यात आली. भारत अ संघाची जबाबदारीही द्रविडनं उचलली आहे.   SBI बँकेतील लिपिकाच्या मुलाची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी, २५ चेंडूंत कुटल्या १०६ धावा, ८ धावांनी हुकलं द्विशतक

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल साऊदॅम्प्टनमध्ये
भारतीय संघानं इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशी जिंकून ICC World Test Championship स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील प्रवेश निश्चित केला. १८ जूनला लॉर्ड्सवर न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. आता हा अंतिम सामना साऊदॅम्पटन येथे होणार आहे. गांगुलीनं या वृत्ताला दुजोरा दिला.   IPL 2021 पूर्वीच RCBच्या फलंदाजाची वादळी फटकेबाजी, कुमार संगकारा, विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rahul Dravid has done a great job at NCA as he looks after the 2nd string players, says Sourav Ganguly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.