भारतीय संघाचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रित बुमराह ( Jasprit Bumrah) कधी, केव्हा व कुणाशी लग्न करणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं अखेर मिळाली. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यापूर्वी जसप्रितनं ( Jasprit Bumrah Wedding  ) सुट्टी घेतली. त्यानं ही सुट्टी लग्नासाठी घेतल्याचे वृत्त नंतर समोर आलं. तेव्हापासून जसप्रितची होणारी पत्नी कोण, या चर्चेत दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमना परमेश्वरन ( anupama parameswara ) हिचं नाव आघाडीवर होतं. पण, अनुपमाच्या आईनं हे वृत्त फेटाळून लावल्यानं पुन्हा जसप्रीतची होणारी पत्नी कोण, असेच ही चर्चा सुरू झाली. जसप्रीत बुमराहची 'नवरी' राजकोटसाठी रवाना; दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत घेणार सात फेरे?


१४-१५ मार्चला गोव्यात होणार लग्नसोहळा
जसप्रित बुमराह मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तो गोवा येथे १४-१५ मार्चला लग्न करणार आहे आणि स्पोर्ट्स अँकर आणि मॉडल संजना गणेशन ( Sanjana Ganesan)  हिच्याशी लग्न करणार आहे. लग्नाची सर्व तयारी झाली आहे.   कोण होणार जसप्रीत बुमराहची नवरी?; टीम इंडियाचा गोलंदाज महाराष्ट्राचा जावई बनणार की साऊथचा? 

कोण आहे संजना गणेसन ?
संजना गणेशन मॉडल आणि अँकर आहे. ती स्टार स्पोर्ट्स इंडियासोबत काम करत असून त्यांच्यासाठी तिनं अनेक क्रिकेट, बॅटमिंटन आणि फुटबॉल स्पर्धांचे अँकरींग केले आहे. तिनं 2019च्या पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचेही सूत्रसंचालन केलं होतं. पुणे येथील तिचा जन्म आहे. सिम्बॉससिस इंस्टीट्युटमधून तिनं B. Techचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यात तिने गोल्ड मेडलही पटकावलं आहे. त्यानंतर 2013-14मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरींग केलं. IPL 2021 पूर्वीच RCBच्या फलंदाजाची वादळी फटकेबाजी, ६ सामन्यांत ६७३* धावा अन् कुमार संगकारा, विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी


 
जसप्रित व संजनाची भेट कुठे झाली? 
२०१४ मध्ये झालेल्या मिस इंडिया स्पर्धेच्या अंतिम स्पर्धेत संजनानं प्रवेश केला होता. याशिवाय तिनं Mtv चॅनेलवरील स्प्लिट्स विला या कार्यक्रमात सहभाग घेतला होता आणि दुखापतीमुळे तिला माघार घ्यावी लागली होती. त्यानंर तिनं आयपीएलमध्ये अँकर म्हणून काम सुरू केलं आणि तेथेच जसप्रितसोबत तिची भेट झाली. या दोघांच्या लग्नाच्या वृत्ताला अजूनही त्यांच्या मॅनेजर किंवा कुटुंबीयांकडून दुजोरा मिळालेला नाही. 

English summary :
Anupama Parameswaran’s mother denies rumours of her upcoming wedding to cricketer Jasprit Bumrah

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jasprit Bumrah will be marrying Sanjana Ganeshan on 14th-15th March in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.