4th consecutive hundred for Devdutt Padikkal in Vijay Hazare 2021, Equal Virat Kohli & Kumar Sangakara World Record | IPL 2021 पूर्वीच RCBच्या फलंदाजाची वादळी फटकेबाजी, ६ सामन्यांत ६७३* धावा अन् कुमार संगकारा, विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी

IPL 2021 पूर्वीच RCBच्या फलंदाजाची वादळी फटकेबाजी, ६ सामन्यांत ६७३* धावा अन् कुमार संगकारा, विराट कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वाचं वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्यानं ९ एप्रिलपासून आयपीएलला सुरूवात होणार आहे. यंदा RCBनं मोठी रक्कम मोजून ग्लेन मॅक्सवेल व कायले जेमिन्सन या परदेशी खेळाडूंना आपल्या ताफ्यात करून घेतले. पण, RCBच्या देशी खेळाडूनं सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare Trophy 2021) स्पर्धेत RCBचा ओपनर देवदत्त पडिक्कल ( Devdutt Padikkal ) यानं धावांचा डोंगर उभा केला आहे. त्याचा हा फॉर्म उपांत्य फेरीच्या सामन्यातही कायम दिसला आणि कर्नाटकच्या सलामीवीरानं सोमवारी केरळच्या गोलंदाजांची धुलाई करताना स्पर्धेतील सलग चौथ्या शतकाची नोंद केली. देवदत्तनं सोमवारी आणखी एक शतक झळकावून विराट कोहली ( Virat Kohli) आणि कुमार संगकारा ( Kumar Sangakara) याच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. (Devdutt Padikkal equal Virat Kohli & Kumar Sangakara World Record BCCI नं जाहीर केलं आयपीएलचं वेळापत्रक; प्रिती झिंटा म्हणते, हे थोडं विचित्र वाटतंय...

केरळविरुद्धच्या सामन्यात देवदत्त व रवीकुमार समर्थ ( १४०*) यानंही शतक झळकावले. या स्पर्धेतील त्याचे हे तिसरे शतक आहे आणि कर्नाटकनं ४२ षटकांत बिनबाद २४४ धावा चोपल्या आहेत. देवदत्तचा फॉर्म सर्वात लक्षवेधी आहे. आयपीएलच्या १३व्या पर्वात यूएईतही त्यानं फटकेबाजीनं सर्वांची वाहवाह मिळवली होती आणि तोच फॉर्म त्यानं विजय हजारे ट्रॉफीतही कायम राखला आहे. त्यानं आजच्या सामन्यात ११८ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि त्यात १० चौकार व २ षटकारांचा समावेश होता. याआधीच्या सामन्यात त्यानं १५२, नाबाद १२६ आणि नाबाद १४५ धावांची खेळी केली होती. देवदत्तचा फॉर्म पाहता त्याला टीम इंडियाच्या वन डे संघातही स्थान मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईत सामने होणार, पण मुंबई इंडियन्स वानखेडेवर नाही खेळणार; जाणून घ्या MI चं संपूर्ण वेळापत्रक

कुमार संगकाराच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
 श्रीलंकेचा माजी सलामीवीर कुमार संगकारा यानं २०१५च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत चार शतकं झळकावून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला होता. आता देवदत्तनं स्थानिक वन डे स्पर्धेत अशी कामगिरी करून एक प्रकारे कुमार संगकाराच्या विक्रमाशी बरोबरीच केली.  वन डेतील पहिले वैयक्तिक द्विशतक ते अनेक विक्रम; मुंबई इंडियन्सकडून महिला क्रिकेटपटूंना मानाचा मुजरा

देवदत्त पडिक्कलची विजय हजारे ट्रॉफी २०२१मधील आतापर्यंची कामगिरी
डाव - ६
धावा - ६७३*
सरासरी - १६८.२५
शतकं - ४
अर्धशतकं -२ 
52(84), 97(98), 152(140), 126*(138), 145*(125),  खेळत आहे 101 (119)

विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी 
विजय हजारे ट्रॉफीच्या एका पर्वात सर्वाधिक ४ शतकं मारण्याच्या विराट कोहलीच्या विक्रमाशी देवदत्तनं बरोबरी केली. विराटनं २००८ -०९च्या स्पर्धेत चार शतकं झळकावली होती. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 4th consecutive hundred for Devdutt Padikkal in Vijay Hazare 2021, Equal Virat Kohli & Kumar Sangakara World Record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.