IPL 2021 Schedule : मुंबईत सामने होणार, पण मुंबई इंडियन्स वानखेडेवर नाही खेळणार; जाणून घ्या MI चं संपूर्ण वेळापत्रक

IPL 2021: Mumbai Indians (MI) Full Schedule Indian Premier League च्या इतिहासात सलग तीनवेळा जेतेपद पटकावण्याची संधी मुंबई इंडियन्सला आहे. आतापर्यंत एकाही संघाला हा पराक्रम करता आलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 10:00 AM2021-03-08T10:00:54+5:302021-03-08T10:04:24+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Mumbai Indians (MI) Full Schedule with Venue, Date, Match Timings   | IPL 2021 Schedule : मुंबईत सामने होणार, पण मुंबई इंडियन्स वानखेडेवर नाही खेळणार; जाणून घ्या MI चं संपूर्ण वेळापत्रक

IPL 2021 Schedule : मुंबईत सामने होणार, पण मुंबई इंडियन्स वानखेडेवर नाही खेळणार; जाणून घ्या MI चं संपूर्ण वेळापत्रक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमुंबई इंडियन्सच्या वाट्याला तीन डबल डेकर सामने, RCBविरुद्ध खेळणार सलामीची लढत१ व १६ मे या तारखांना कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सशी भिडणार

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021 Schedule) १४व्या पर्वाचं वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता या सहा शहरांमध्ये आयपीएलचे सामने ( IPL Matches) होणार आहेत. या शहरांमधये मुंबईचे नाव असल्यानं मुंबई इंडियन्सचे ( Mumbai Indians) चाहते आनंदीत झाले आहेत, परंतु त्यांचा हा आनंद क्षणात गायबही झाला. कोरोना परिस्थितीमुळे IPL 2021च्या सामन्यांना प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. त्यात यंदाच्या आयपीएलमध्ये एक वेगळाच प्रयोग करण्यात येत आहे आणि त्यामुळे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर IPL 2021 Match होतील, परंतु मुंबई इंडियन्स ( MI ) एकही सामना खेळणार नाही.  No team will have home advantage in the 2021 IPL

सलग तिसऱ्यांदा आयपीएल जेतेपद पटकावण्याची संधी
Indian Premier League च्या इतिहासात सलग तीनवेळा जेतेपद पटकावण्याची संधी मुंबई इंडियन्सला आहे. आतापर्यंत एकाही संघाला हा पराक्रम करता आलेला नाही. MI नं २०१९ व २०२०मध्ये अनुक्रमे चेन्नई सुपर किंग्स ( CSK) व दिल्ली कॅपिटल्सा ( DC) यांच्यावर विजय मिळवून आयपीएल जेतेपदं नावावर केली होती. रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं ( MI) पाच जेतेपद पटकावली आहे. चेन्नई सुपर किंग्सनं तीन वेळा, तर कोलकाता नाइट रायडर्सनं दोन वेळा ही कामगिरी केली आहे.

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians full squad ) - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंग 

( IPL 2021 Auction) लिलावात खरेदी केलेले खेळाडू ( Players bought at Auction)- नॅथन कोल्टर नायर ( Nathan Coulter-Nile) ५ कोटी, अॅडम मिल्ने ( Adam Milne) ३.२ कोटी, पीयूष चावला ( Piyush Chawla) २.४ कोटी, जेम्स निशम ( James Neesham) Rs 50 lakh, युधवीर चरक ( Yudhvir Charak) २० लाख, मार्को जॅन्सेन ( Marco Jansen) २० लाख, अर्जुन तेंडुलकर ( Arjun Tendulkar) २० लाख

मुंबई इंडियन्सनचं संपूर्ण वेळापत्रक ( MI’s schedule for IPL 2021 )

तारीखसामनावेळठिकाण
९ एप्रिलवि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसायं. ७.३० वा.चेन्नई
१३ एप्रिलवि. कोलकाता नाईट रायडर्ससायं. ७.३० वा.चेन्नई
१७ एप्रिलवि. सनरायझर्स हैदराबादसायं. ७.३० वा.चेन्नई
२० एप्रिलवि. दिल्ली कॅपिटल्ससायं. ७.३० वा.चेन्नई
२३ एप्रिलवि. पंजाब किंग्ससायं. ७.३० वा.चेन्नई
२९ एप्रिलवि. राजस्थान रॉयल्सदु. ३.३० वा.दिल्ली
१ मेवि. चेन्नई सुपर किंग्ससायं. ७.३० वा.दिल्ली
४ मेवि. सनरायझर्स हैदराबादसायं. ७.३० वा.दिल्ली
८ मेवि. राजस्थान रॉयल्ससायं. ७.३० वा.दिल्ली
१० मेवि. कोलकाता नाईट रायडर्ससायं. ७.३० वा.बंगळुरू
१३ मेवि. पंजाब किंग्सदु. ३.३० वा.बंगळुरू
१६ मेवि. चेन्नई सुपर किंग्ससायं. ७.३० वा.बंगळुरू
२० मेवि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसायं. ७.३० वा.कोलकाता
२३ मेवि. दिल्ली कॅपिटल्सदु. ३.३० वा.कोलकाता

 

 

Web Title: IPL 2021: Mumbai Indians (MI) Full Schedule with Venue, Date, Match Timings  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.