शाहिद आफ्रिदी अन् जावई शाहिन आफ्रिदी यांचा 'दुल्हे राजा'वाला व्हिडीओ व्हायरल, लोकं घेतायेत मजा!  

२० वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीननं २०१८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याने २२ एकदिवसीय सामने खेळले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 03:16 PM2021-03-08T15:16:22+5:302021-03-08T15:17:07+5:30

whatsapp join usJoin us
Shahid Afridi Getting Bowled to Shaheen Afridi in PSL Gets a 'Dulhe Raja' Twist in Hilarious Video | शाहिद आफ्रिदी अन् जावई शाहिन आफ्रिदी यांचा 'दुल्हे राजा'वाला व्हिडीओ व्हायरल, लोकं घेतायेत मजा!  

शाहिद आफ्रिदी अन् जावई शाहिन आफ्रिदी यांचा 'दुल्हे राजा'वाला व्हिडीओ व्हायरल, लोकं घेतायेत मजा!  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तान क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीचा ( Shaheen Shah Afridi) याचं लग्न माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या (shahid afridi) थोरल्या मुलीसोबत शाहीन होणार आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं सोशल मीडियावर पोस्ट करून ही गुड न्यूज दिली. शाहिनच्या कुटुंबीयांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला. साखरपुड्याची नेमकी तारीख अद्याप कळू शकलेली नाही. 

"शाहिन आणि शाहिद आफ्रिदीची थोरली मुलगी अक्सा आफ्रिदी यांचा साखरपुडा निश्चित झाला आहे. दोन्ही कुटुंबीयांनी गेल्या अनेक वर्षांपासूनच्या ओळखीचं रुपांतर आता नातेसंबंधांत बदलण्याचं ठरवलं आहे", असं शाहीनचे वडील अयाज खान म्हणाले. २० वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीननं २०१८ साली वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याने २२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ४५ विकेट्स घेतल्या आहेत. तर २१ टी२० सामन्यात २४ विकेट्स आणि १५ टी२० सामन्यात ४८ विकेट्स घेतल्या आहेत.

काय आहे दुल्हे राजा प्रकरण?
शाहिद आफ्रिदीनं ही आनंदाची बातमी शेअर करताच सोशल मीडियावर गोविंदाच्या 'दुल्हे राजा' या गाण्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. पाकिस्तान सुपर लीगमधील २०१८ सालचा हा व्हिडीओ आहे. ज्यात शाहिनच्या गोलंदाजीवर पहिल्याच चेंडूवर आफ्रिदीनं जोरदार षटकार खेचला, परंतु पुढच्याच चेंडूवर शाहिननं मधला स्टम्प उडवून शाहिद आफ्रिदीला बाद केले.

पाहा व्हिडीओ.. 






Web Title: Shahid Afridi Getting Bowled to Shaheen Afridi in PSL Gets a 'Dulhe Raja' Twist in Hilarious Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.