WPL च्या यंदाच्या चौथ्या हंगामात या स्पर्धेतील सर्वात यशस्वी आणि गत चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा संघ साखळी फेरीतूनच स्पर्धेबाहेर पडला.
मुंबई इंडियन्सच्या संघाने WPL च्या आतापर्यंतच्या इतिहासात २०२३ आणि आणि २०२५ या हंगामात दोन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. यावेळी संघ अपयशी ठरला असला तरी हरमनप्रीत कौरनं यंदाची स्पर्धा गाजवली.
हरमनप्रीत कौरनं यंदाच्या हंगामात ८ सामन्यात ३४२ धावा केल्या असून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ती सर्वात अव्वलस्थानावर विराजमान आहे.
WPL च्या इतिहासात १ हजार धावांचा टप्पा पार करणारी पहिली आणि यंदाच्या हंगामात स्पर्धेच्या इतिहासातील पहिले शतक झळकवणारी MI ची नॅटली सायव्हर ब्रंट या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. तिने यंदाच्या हंगामात ३२१ धावा केल्या आहेत.
या दोघींच्या नंतर RCB ची कर्णधार स्मृती मानधनाचा नंबर लागतो. स्मृतीनं साखळी फेरीतील ८ सामन्यातील ८ डावात २९० धावा केल्या आहेत. तिला या दोघींना ओव्हरेट करून ऑरेंज कॅप पटकवण्याची संधी आहे.
RCB च्या संघाने यंदाच्या हंगामातील फायनल गाठली आहे. फायनल सामन्यात ५३ धावांची खेळी तिला नंबर वनवर घेऊन जाऊ शकते. संघाला दुसरे विजेतेपद मिळवून देण्यासह स्मृती नंबर वनचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.
UP वॉरियर्सची कर्णधार मेग लेनिंग हिने यंदाच्या हंगामात २४८ धावा केल्या असून या संघाचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आल्यामुळे तिला आगेकूच करता येणार नाही.
गुजरात जाएंट्सची कर्णधार एश्ली गार्डनर हिच्याकडेही हमरनप्रीत कौरला मागे टाकण्याची संधी आहे. सध्याच्या घडीला तिच्या खात्यात २४४ धावा आहेत.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या एलिमिनेटरचा सामना जिंकला तर गुजरात फायनलमध्ये एन्ट्री मारू शकतो. या परिस्थिती गार्डनरला दोन संधीत ९८ धावा करून हरमनप्रीतला ओव्हरटेक करत ऑरेंज कॅपवर कब्जा करता येऊ शकतो.