बाबर आजमनं गुपचूप उरकलं लग्न? तरुणीसोबतच्या 'सेल्फी'ने चर्चा रंगली, ती तर जगातील टॉपर निघाली

पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam ) चाहत्यांच्या घोळक्यात अडकलेला पाहायला मिळाला. बाबर आजम अम्पायर अलीम दार यांच्या मुलाच्या लग्नात पोहोचला.

पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam ) चाहत्यांच्या घोळक्यात अडकलेला पाहायला मिळाला. बाबर आजम अम्पायर अलीम दार यांच्या मुलाच्या लग्नात पोहोचला.

लग्नातील पाहुण्यांनी बाबरला घेरले आणि प्रत्येकजण फोटो काढण्यासाठी उत्सुक दिसत होता.

लग्नाचा एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बाबर एका मुलीसोबत सेल्फीमध्ये आहे. ही बाबर आझमची भावी पत्नी असल्याचे चाहते म्हणत आहेत.

आलम दार यांच्या मुलाच्या लग्नात बाबर पांढरा शर्ट आणि सिल्व्हर ब्लेझर घालून पोहोचला होता. बाबरला लग्नात पाहून इतर पाहुणेही उत्साहित झाले.

एका मुलीने बाबरसोबत सेल्फी काढला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. हा फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बाबरसोबत दिसणारी ही मुलगी कोण आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा आहे. ही बाबर आझमची पत्नी नाही. ती अम्पायर अलीम दार यांची भाची आहे. जारा नईम असे तिचे नाव आहे.

जारा आर्थिक अहवाल परीक्षेत जगभरातील स्पर्धकांमध्ये टॉपर आली आहे. तिच्या या यशानंतर ती सर्वप्रथमच चर्चेत आली होती.

सोशल मीडियावरही तिचे अडीच लाख फॉलोअर्स आहेत आणि तिचे ग्लॅमरस फोटोंवर लाईक्स व कमेंट्सचा पाऊस पाहायला मिळतोय.