भारताचा १४ वर्षीय युवा बॅटर ज्या स्पर्धेत उतरतो तिथं धमाका करून दाखवतो. अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने विक्रमी शतक झळकावले.
UAE विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करतानाना वैभव सूर्यवंशी याने ९५ चेंडूत ९ चौकार आणि १४ षटकारांच्या मदतीने १८० च्या स्ट्राईक रेटसह १७१ धावांची खेळी साकारली.
द्विशतकाला तो अगदी सहज गवसणी घालेल, असे वाटत असताना त्याने एक अतरंगी फटका खेळत आपली विकेट गमावली. पण या खेळीसह त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
U19 मध्ये भारतीय संघाकडून सर्वाधिक धावसंख्या उभारणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. या यादीत त्याने शिखर धवन शुभमन गिल आणि मयंक अग्रवाल या दिग्गजांना मागे टाकले आहे.
त्यापाठोपाठ आता वैभव सूर्यवंशीचा नंबर लागतो. वैभव सूर्यवंशीनं १७१ धावा करत अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे.
या यादीत राज अंगद बावा तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०२२ मध्ये युगांडा अंडर १९ संघाविरुद्ध बावाने १०८ चेंडूत नाबाद १६२ धावांची खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे.
मयंक अग्रवालनं २००९ मध्ये ऑस्ट्रेलियन अंडर १९ संघाविरुद्ध १८४ चेंडूत १६० धावांची खेळी केली होती.
भारतीय कसोटी आणि वनडे संघाचा विद्यमान कर्णधार शुभमन गिलनं २०१७ मध्ये वानखेडेच्या मैदानात इग्लंड अंडर १९ संघाविरुद्ध १५७ चेंडूत १६० धावांची खेळी साकारली होती.
२००४ मध्ये शिखर धवन याने स्कॉटलंड अंडर १९ संघाविरुद्धच्या वनडेत ढाकाच्या मैदानात १४१ चेंडूत नाबाद १५५ धावांची खेळी साकारली होती.