अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने इतिहास रचला.
सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा जिंकून दाखवत टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी मैदानात एकच जल्लोष केला. संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या जसप्रीत बुमराहच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून जाणारा आहे.
संजू सॅमसन यानेही भारतीय संघाला जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तो कुलदीपसोबत ट्रॉफी घेऊन मैदानात मिरवताना दिसला.
अर्शदीप सिंग यानेही एका हाती तिरंगा तर दुसऱ्या हाती विश्वचषकाची ट्रॉफी घेऊन खास अंदाजात सेलिब्रेशन केले.
ईशान किश आणि अभिषेक शर्मा यांच्या सेलिब्रेशनचा थाटही शानदारच होता.
हार्दिक पांड्याने पुन्हा एकदा आपल्या आयकॉनिक स्टाईलसह टी-२० वर्ल्ड ट्रॉफीसह खास फोटो काढल्याचे पाहायला मिळाले.
तिसऱ्यांदा ट्रॉफी उंचावल्यावर संघातील सर्व खेळाडूंनी मिळून एकच जल्लोष केला.
रिंकू सिंह याने वर्ल्ड चॅम्पियन होत दिवंगत वडिलांचे स्वप्न साकार केले. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान वडिलांचे निधन झाल्यावरही तो संघाला जॉईन झाला होता.
तिलक वर्मा आणि मोहम्मद सिराज यांनीही स्टेडियमवर उत्साहात आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले.
वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदानंतर मिळालेल्या मेडल्ससह कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी ऑलिम्पिक मेडलिस्टच्या थाटात फोटोसाठी पोझ दिल्याचे पाहायला मिळाले.