Rohit Sharma and Seema Khan : सोहेल खानची पत्नी सीमा आहे Rohit Sharma ची नातेवाईक; हे अनेकांना माहीतच नाही!

Sohail Khan and Seema Khan Divorce: बॉलिवूडमध्ये आज दिवसभर आणखी एका सेलिब्रेटीच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे. बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचा भाऊ सोहेल खान (Sohail Khan )आणि त्याची पत्नी सीमा ( Seema Khan ) यांनी घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज केल्याचे कळतंय. परस्पर सहमतीने हा घटस्फोट होत असल्याचंही समजतंय.

अर्थात अद्याप सोहेल वा सीमा यांनी घटस्फोटाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सोहेल व सीमा यांच्या लग्नाला २४ वर्ष पूर्ण झाली आहेत.

१९९८ साली दोघांचं लग्न झालं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. चंकी पांडेच्या साखरपुड्यात दोघांची भेट झाली होती. पहिल्याच नजरेत दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले होते.

धर्म वेगळे असल्यानं या प्रेमात अनेक अडचणी आल्यात. सीमाच्या कुटुंबाला सोहेल व सीमाचं नातं, त्यांचं लग्न मान्य नव्हतं. पण दोघांनीही घरच्यांना न जुमानता लग्न केलं होतं.

मध्य रात्री मौलवींना किडनॅप करून दोघांना निकाह झाला होता. नंतर दोघांनी आर्य मंदिरात लग्न केलं होतं. त्यांना निर्वाण आणि योहन अशी दोन मुलं आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, २०१७ पासून सोहेल व सीमा वेगवेगळे राहत आहेत. सीमा ही फॅशन डिझाईनर आहे. ‘बांद्रा 190’ नावाचं तिचं एक फॅशन स्टोरही आहे.

भारताचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) व सीमा हे नातेवाईक आहेत, हे अनेकांना माहीत नाही. सीमा ही रोहितची पत्नी रितिका सजदेह हिचा चुतल भाऊ बंटी याची सख्खी बहीण आहे. म्हणजेच सीमा व रितिका या चुलत बहिणी आहेत. या नात्याने सीमा ही रोहितची मेहुणी झाली.